Marathi News> भारत
Advertisement

पेट्रोलच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचा दर

काय आहे आज पेट्रोलचा दर?

पेट्रोलच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या आजचा दर

नवी दिल्ली : पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत गेल्या चार दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत ४६ पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत सोमवारी पेट्रोलच्या किंमतीत १२ पैशांची वाढ झाली. दिल्लीत पेट्रोलचा भाव ७४.६६ रुपये प्रति लीटर इतका आहे. 

तर मुंबई आणि कोलकातामध्येही पेट्रोलच्या किंमतीत १२ पैशांची वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलच्या किंमतीत १३ पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे. इंडियन ऑइलच्या माहितीनुसार, कोलकातामध्ये पेट्रोल ७७.३४ रुपये, मुंबईत ८०.३२ रुपये आणि चेन्नईत ७७.६२ रुपये प्रति लीटर इतका दर आहे.

ऑइल मार्केटिंग कंपन्या रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करतात. कंपन्यांकडून जाहीर करण्यात आलेल्या दरात पेट्रोलच्या किंमतीसह एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन जोडल्यानंतर याची किंमत जवळपास दुप्पट होते. 

आपापल्या  शहरांतील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती घरबसल्याही जाणून घेता येऊ शकतात. केवळ एका एसएमएसवर (SMS) पेट्रोल-डिझेलच्या किंमतीची माहिती मिळू शकते. सकाळी ६ वाजल्यानंतर ९२२४९ ९२२४९ या क्रमांकावर SMS पाठवून किंमतींची माहिती मिळू शकते. 

  

Read More