Marathi News> भारत
Advertisement

ऋषी कपूरचे प्रियासाठी ट्विट, 'माझ्यावेळी कुठे होतीस ?'

आपल्या नजरेने सर्वांना घायळ करणाऱ्या प्रिया प्रकाशचे एका रात्रीत इंस्टाग्रामवर ६ लाखांहुन अधिक फॉलोव्हर्स झाले. प्रिया मल्यालम चित्रपट ओरू अदार लव यातून डेब्यू करत आहे. या चित्रपट शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे.

ऋषी कपूरचे प्रियासाठी ट्विट, 'माझ्यावेळी कुठे होतीस ?'

मुंबई : आपल्या नजरेने सर्वांना घायळ करणाऱ्या प्रिया प्रकाशचे एका रात्रीत इंस्टाग्रामवर ६ लाखांहुन अधिक फॉलोव्हर्स झाले. प्रिया मल्यालम चित्रपट ओरू अदार लव यातून डेब्यू करत आहे. या चित्रपट शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित आहे.

'नॅशनल क्रश' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रियाच्या चाहत्यांच्या यादीत अजून एक नाव आलं आहे.

ऋषी कपूर ट्विट 

अभिनेते ऋषी कपूर हे देखील प्रियाच्या अदांचे दिवाने झाले आहेत. त्यांनी प्रियासाठी ट्विट केलयं. 'मी प्रियाच्या स्टारडमची भविष्यवाणी करतोय.

ती एक्सप्रेशन खूप चांगल्या पद्धतीनं आणते. नखरेबाज असूनही इनोसंट आहे. असे ट्विट त्यांनी केले. तर माझ्या वेळेत तू नव्हतीस ? असेही मस्करीत म्हटलेय.

यामध्ये ठरली अव्वल 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार प्रिया प्रकाश गुगल सर्चमध्ये अव्वल ठरली आहे. तिने चक्क सनी लियोनीला मागे टाकले आहे. तिची लोकप्रियता इतकी वाढली आहे की फक्त सनीच नव्हे तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण आणि कतरिना कैफलाही तिने मागे टाकले आहे.

तिचे अनेक दिवाने पण ती याच्यासाठी वेडी

मीडिया रिपोर्टनुसार, प्रियाचा जन्म केरळमधील त्रिशूर येथे झाला. रातोरात प्रसिद्ध झालेली ही व्हायरल गर्ल सध्या त्रिशूर येथील विमला कॉलेजमध्ये बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.

ओरू अदार लव या चित्रपटात ती एका विद्यार्थीनीची भूमिका साकारत आहे.

तिला स्पोर्ट्सची आवड असल्याचे तिने सांगितले. इतकंच नाही तर एका मुलाखतीत तिने सांगितले की, क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तिला प्रचंड आवडतो.

Read More