Ritesh Agarwal Net Worth: कोणतेही काम करताना लाज न बाळगणे हा देखील यशाचा एक कानमंत्र आहे. 1900 कोटींची संपत्ती असलेल्या OYO हॉटेलचा संस्थापक आणि सीईओ रितेश अग्रवाल त्याच्या आयुष्यात हा नियम फॉलो करतो. रितेश अग्रवाल हा स्वत: OYO हॉटेलचे टॉयलेट स्वच्छ करतो. यामागाचे कारण देखील त्याने सांगितले आहे. हे कारण जाणून नक्कीच त्याचे कौतुक वाटेल. तसेच आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर त्याची ही कृती नक्कीत दिशा दर्शक ठरेल.
हुरुन इंडिया 2024 च्या अहवालानुसार 29 वर्षीय रितेश अग्रवालची एकूण संपत्ती 19 हजार कोटी रुपये आहे. 2013 मध्ये ओयो कंपनी सुरु झाली. सध्या जगातील 80 देशांमध्ये या कंपनीचा विस्तार झाला आहे. यशाचे शिखर गाठणाऱ्या रितेशचे पाय अद्याप जमिनीवर आहेत आणि हेच त्याच्या यशाचे रहस्य आहे.
कंपनीच्या अनेक हॉटेलचे टॉयलेट मी स्वत: स्वच्छ करतो. यामुळे आपले काम हे कर्मचाऱ्यांसाठी रोल मॉडेल ठरते. तसेच कोणचेही काम हे लहान नसते असा संदेश कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचतो असे रितेश अग्रवाल सांगतात. एका यशस्वी उद्योजकाने भीती, लाज, अहंकार आणि अभिमान यासारख्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे असा सल्ला रितेश देतात.
ओयो हॉटेलन्सनं नियमात मोठे बदल केलेत.. त्यामुळे सहज कुणालाही आता ओयोमध्ये रुम बुक करता येणार नाही.. अविवाहित कपल्ससाठी तर मोठे बदल कऱण्यात आलेत. OYO हॉटेल बुक करायचं असेल तर लग्नाचा पुरावा द्यावा लागणार आहे. लग्नाचा पुरावा नसेल तर तुम्हाला हॉटेल बुक करता येणार नाही. ऑनलाईन बुकिंगसाठी तात्काळ नियम लागू असेल. सर्व हॉटेल्सनी नव्या नियमांचं पालन करण्याचे OYOचे निर्देश आहेत.