Marathi News> भारत
Advertisement

लालू यादवांच्या आयुष्यात आले नवे शत्रू, जेलमध्ये उडवली झोप

लालूंची झोप उडाली

लालू यादवांच्या आयुष्यात आले नवे शत्रू, जेलमध्ये उडवली झोप

पटना : चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेले आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी काही कमी होत नाही आहेत. आता काही कुत्र्यांनी त्यांना हैराण करुन सोडलं आहे. कुत्र्यांमुळे लालूंची झोप उडाली आहे. लालू यादव जेलमध्ये जेव्हा झोपण्य़ाचा प्रयत्न करतात तेव्हा कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे त्यांना झोप येत नाही. 

रात्री कुत्र्यांच्या आवाजामुळे लालूंची झोप उडाली आहे. लालू यादव यांनी यामुळे त्यांना जेल बदलून देण्याची मागणी केली आहे. आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांना सुपर स्पेशालिटी विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. जेथे कुत्र्यांच्या आवाजाने त्यांना झोपणे कठिण झाले होते. दिवसभर झोपणारे हे कुत्रे रात्री लालूंना झोपू देत नाहीत.

लालू यादव यांचे समर्थक इरफान अंसारी यांनी म्हटलं की, लालू यादव यांच्या जीवनात कुत्रे मोठी अडचण बनले आहे. राजकारणात अनेकांना झोपवणारे लालू यादवांची झोप मात्र आता या कुत्र्यांनी उडवली आहे. लालू यादव यामुळे पेईंग वॉर्डची मागणी करत आहे.

Read More