Marathi News> भारत
Advertisement

लालू यादव दोषी, आरजेडीची भाजपवर टीका

देवघर चारा घोटाळा प्रकरणात लालू यादव यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. यानंतर आता आरजेडीने सीबीआय आणि भाजपवर टीका केली आहे.

लालू यादव दोषी, आरजेडीची भाजपवर टीका

रांची : देवघर चारा घोटाळा प्रकरणात लालू यादव यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. यानंतर आता आरजेडीने सीबीआय आणि भाजपवर टीका केली आहे.

भाजपवर टीका

कोर्टाच्या निकालानंतर आरजेडीचे प्रवक्ता मनोज झा यांनी पत्रकार परिषद घेत प्रश्न उपस्थित केले आहेत. मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या इशाऱ्यावर सीबीआय काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

न्यायव्यवस्थेवर विश्वास

आरजेडीने म्हटलं की, अवैध मंजुरीवर ज्यांनी एफआयआर दाखल केली त्यांनाच तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. यामगे भाजपचं कारस्थान आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. हा देश फक्त २ व्यक्ती चालवत आहेत.

लालू यादव दोषी 

चारा घोटाळ्यामध्ये लालूंना दोषी ठरवल्यानंतर आता ३ जानेवारीला त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. लालू यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांनी तुरुंगात पाठवण्यात येणार आहे.

Read More