Marathi News> भारत
Advertisement

फक्त बुलेटच नाही तर 'या' गोष्टीही बनवते 'रॉयल एनफील्ड'; कट्टर बुलेट प्रेमींनाही नसेल कल्पना

Royal Enfield Company : रॉयल एनफील्ड कंपनी मोटरसायकलशिवाय आणखी काय काय बनवते माहितीये?

फक्त बुलेटच नाही तर 'या' गोष्टीही बनवते 'रॉयल एनफील्ड'; कट्टर बुलेट प्रेमींनाही नसेल कल्पना

Royal Enfield Company : रॉयल एनफील्ड मोटरसायकल कंपनी ही त्यांच्या पावरफूल बाइक्ससाठी ओळखली जाते. पण कंपनी फक्त बाईक्स बनवत नाही तर इतर गोष्टी देखील बनवते आणि दुसऱ्या सुविधा देखील देताना दिसते. चला तर जाणून घेऊया रॉयल एनफील्ड कोणत्या-कोणत्या क्षेत्रात सक्रिय आहे. 

रॉयल एनफील्ड मोटरसायकल राइडर्ससाठी सुरक्षा आणि आराम या सगळ्या गोष्टी मिळायला हव्या यासाठी रायडिंद गियर आणि एक्सेसरीज बनवते. त्यात हेलमेट, जॅकेट, ग्लव्ह्ज, बूट्स आणि पॅन्ट सारख्या गोष्टी देखील बनवतात. त्याशिवाय कंपनी रायडिंग-संबंधीत एक्सेसरीज जसं की बॅग्स, गॉगल्स इतर सगळ्या गोष्टी विकते. 

कस्टमाइज एक्सेसरीज

इतकंच नाही तर कस्टमाइजेशनसाठी रॉयल एनफील्ड वेगवेगळ्या प्रकारचे मोटरसायकल एक्सेसरीज उपलब्ध करून देते. यात सायलेंसर, बॅकरेस्ट, इंजन गार्ड्स, सीट कव्हर आणि लगेज कॅरियर सारख्या गोष्टी देखील आहेत. ज्यामुळे रायडरला चांगला आणि कम्फर्टेबल असा अनुभव मिळतो. 

लाइफस्टाइल मर्चेंडाइज

रॉयल एनफील्ड आपल्या ब्रॅंडला वाढवण्यासाठी वेगवेगळ्या मर्चेंडाइज देखील देतात. ज्यात टी-शर्ट, टोपी, कुंजी चेन, पोस्टर आणि स्टिकर सारख्या गोष्टी देखील आहे. हे प्रोडक्ट्, रायडरला त्यांची बाईक ड्राइव्ह करण्यास खूप मदत करतात. 

रॉयल एनफील्ड मोटरस्पोर्ट्सच्या क्षेत्रात सक्रिय आहे. कंपनी हिमालयन ओडिसी आणि इतर आंतरराष्ट्रीय मोचर सायकल रॅलीसारखे एडव्हेंचर राइड्सचे आयोजन करते. हे कार्यक्रम मोटरसायकल चालवायला ज्यांना आवडते त्यांच्यासाठी अर्थात त्यांना असलेल्या एडव्हेंचरचा एक सुंदर अनुभव करून देते. 

हेही वाचा : 27 वर्षांपूर्वींचा चित्रपट खलनायकानं 50 दिवस केली नाही अंघोळ; पाहताच गरुड आणि गिधाड यायचे अन्...

रॉयल एनफील्ड विषयी बोलायचं झालं तर ही भारतीय कंपनी आहे, जी मोटरसायकल अर्थात बाईकची निर्मिती करते. त्यांचं मुख्यालय हे चेन्नई, तमिळमाडूमध्ये आहे. भारतात असलेलं हे सगळ्यात जून मोटरसायकल ब्रॅंड आहे. रॉयल एनफील्ड ही 1901 मध्ये इंग्लंडच्या एनफील्ड सायकल कंपनीनं सगळ्यात आधी बनवली होती. इतके वर्षे झाले असले तरी सुद्धा रॉयल एनफील्डची मागणी काही कमी नाही. दिवसेंदिवस या मोटरसायकलची मागणी वाढत असल्याचं पाहायला मिळतं. रॉयल एनफील्ड त्याच्या हटके लूक आणि तिची मजबूतीसाठी ओळखली जाते. ही मोटरसायकल फक्त भारतात नाही तर परदेशात देखील अनेकांची आवडती आहे. 

Read More