Marathi News> भारत
Advertisement

'5 दिवस ऑफिसला येण्याचा ट्रेंड...', नारायणमूर्तींमुळे गदारोळ सुरु असतानाच हर्ष गोयंका यांचं मोठं विधान

इंफोसिसचे सह-संस्थापक नारायणमूर्ती यांनी देशातील तरुणांनी आठवड्याचे 70 तास काम करावं असा सल्ला दिल्याने वाद निर्माण झाला आहे. यादरम्यान आरपीजी एंटरप्रायजेसचे चेअरमन हर्ष गोयंका यावर व्यक्त झाले आहेत.   

'5 दिवस ऑफिसला येण्याचा ट्रेंड...', नारायणमूर्तींमुळे गदारोळ सुरु असतानाच हर्ष गोयंका यांचं मोठं विधान

इंफोसिसचे सह-संस्थापक नारायमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिल्याने वाद पेटला असून सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. देशाच्या प्रगतीसाठी भारतातील तरुणांनी आठवड्याचे 70 तास काम केलं पाहिजे असं ते म्हणाले आहेत. नारायणमूर्तींच्या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चासत्रच सुरु झालं आहे. काहींनी त्यांना विरोध केला आहे, तर काहींनी समर्थन केलं आहे. यादरम्यान आरपीजी एंटरप्रायजेसचे चेअरमन हर्ष गोयंका यांनीही आपलं मत मांडलं आहे. 

हर्ष गोयंका यांची पोस्ट

हर्ष गोयंका यांनी एक पोस्ट शेअर केली असून नारायणमूर्ती यांच्या अगदी उलट भूमिका मांडली आहे. 5 दिवसांचा कार्यालयीन आठवडा आता संपला आहे. लोक त्यांच्या कार्यालयीन वेळेच्या जवळपास 33 टक्के काम शक्य त्या ठिकाणाहून करत आहे आणि हे गेमचेंजर आहे. लोकांसाठी ही लवचिकता  8 टक्के पगारवाढ मिळण्यासारखंच आहे. ही लवचिकता समजून घेणं आणि रोजचा प्रवास टाळणं याला आम्ही जास्त महत्त्व देत आहोत असं हर्ष गोयंका यांनी सांगितलं आहे. 

'तरुणांना हार्टअटॅक आल्यावर आश्चर्य वाटू देऊ नका', नारायणमूर्तींच्या '70 तास काम' सल्ल्यावर डॉक्टरची पोस्ट व्हायरल

 

तसंच पुढे त्यांनी लिहिलं आहे की, "हायब्रीड वर्क हेच देशाचं वर्तमान आणि भविष्य असेल. तसंच 5 दिवसांच्या ऑफिसचा ट्रेंडही वेळेसह पूर्णपणे संपून जाईल".

'आठवड्याचे 70 तास काम करा', म्हणणाऱ्या नारायणमूर्ती यांना वीर दासचा टोला, म्हणाला 'मजा मारत इंग्लंड देश...'

 

"हायब्रीड वर्क देशाचं वर्तमान आणि भविष्य आहे. 50 ते 70 काम करणं आता तुमच्या महत्वाकांक्षा आणि उद्देशांसाठीच असेल. बदल स्वीकार करा, कामाच्या नव्या पद्धतीचा अवलंब करा. ऑफिस आणि घराच्या मधील योग्य जागा शोधा. तुमच्या आयुष्यात जास्त महत्त्वाचं काय आहे त्याला प्राथमिकता देण्याची ही वेळ आहे," असं हर्ष गोयंका म्हणाले आहेत. 

नारायणमूर्ती काय म्हणाले आहेत?

"देशाला प्रगती हवी असेल तर तरुणांनी रोज किमान 12 तास काम करायला हवं, म्हणजेच आठवड्याचे 70 तास. तेव्हाच भारत अशा अर्थव्यवस्थांशी स्पर्धा करु शकेल, ज्या गेल्या दोन ते दशकांपासून प्रचंड यशस्वी आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपानमधील नागरिकांनी हेच केलं होतं," असं नारायणमूर्ती म्हणाले आहेत. त्यांनी पॉडकास्ट 'द रेकॉर्ड' साठी इंफोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांच्यांशी संवाद साधताना हा सल्ला दिला. 

Read More