मुंबई : पीएम केअर्स फंड ट्रस्टने बुधवारी कोविड-१९ विरोधात पुकारलेल्या युद्धाकरता ३१०० कोटी रुपयांचे खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. पीएम केअर्स फंडातील जाहिर केलेले ३१०० कोटी रुपये खर्च करण्यासाठी वर्गवारी केली आहे. यामधील २००० कोटी रुपये व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी तर १००० कोटी रुपये हे मजुरांच्या प्रवाशाकरता जाहीर करण्यात आले आहेत.
याबरोबरच १०० कोटी रुपये कोरोना व्हायरसच्या व्हॅक्सीनच्या विकासाकरता जाहीर केले आहेत. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ही संस्था २७ मार्चला स्थापन करण्यात आली. यामध्ये संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांचा देखील समावेश आहे. (मोठी बातमी: सरकारकडून PM CARES FUND मधील खर्चाचा तपशील जाहीर)
कोविड -१९ cases प्रकरणांचा सामना करण्यासाठी पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी ५० हजार ‘मेड-इन-इंडिया’ व्हेंटिलेटर पंतप्रधानांकडून खरेदी केले जातील. याची खरेदी पीएम केअर्स फंडातून केली जाणार असून २००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हे व्हेंटिलेटर्स कोरोनाशी लढणाऱ्या रूग्णालयांना पुरवले जाणार आहेत. या व्हेंटिलेटरर्सचा पुरवठा हा सगळ्या राज्यांना केला जाणार आहे.
PM-CARES Fund Trust Allocates Rs. 3100 Crore for Fight against COVID-19. https://t.co/jMaY8ZTE7F
— PMO India (@PMOIndia) May 13, 2020
via NaMo App pic.twitter.com/fwlgJYVeRO
तसेच यामधील १००० कोटी रुपये हे मजुरांसाठी खर्च केले जाणार आहेत. यामध्ये मजुरांच्या राहण्यासाठी, अन्नपुरवठयासाठी, आरोग्य सेवा आणि त्यांच्या प्रवासासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे. मजुरांसाठी अनेक विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. यामाध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात अडकलेले अनेक मजूर आपल्या घरी परतणार आहेत.
PM केअर्स फंडबाबत अनेक काँग्रेससह विरोधी पक्षांनी प्रश्न निर्माण केले आहेत. त्यांचा असा आरोप आहे की, PM केअर्स फंड ही संस्था पारदर्शी नाही. यामधील सगळा पैसा हा पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये ट्रान्सफर करावेत. या दोन्ही फंडाचा मुख्य हेतू हा देशावर आलेल्या संकटाशी सामना करणे असाच आहे. पण कोरोना व्हारसशी लढण्याकरता असा एका वेगळ्या फंडाची आवश्यकता आहे. जो फक्त कोरोनाशी लढण्यासाठी वापरल जाईल.