Marathi News> भारत
Advertisement

VIDEO: नवरीसोबत सेल्फी काढण्यास विरोध केल्याने हाणामारी

एका लग्न समारंभात सेल्फी काढताना एक विचित्र प्रकार घडला आहे.

VIDEO: नवरीसोबत सेल्फी काढण्यास विरोध केल्याने हाणामारी

नवी दिल्ली : सध्याच्या युवा पिढीला सेल्फीचं भलतचं वेड लागल्याचं पहायला मिळत आहे. हव्या त्या बॅकग्राऊण्डसह एकट्याचा किंवा मग अगदी मित्र-मैत्रिणींसोबत सेल्फी काढताना आपण अनेकांना पाहीलं असेल. एका लग्न समारंभात अशाच प्रकारे सेल्फी काढताना एक विचित्र प्रकार घडला आहे.

(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)

लग्न समारंभात वधूसोबत सेल्फी काढताना असा काही गोंधळ झाला की, त्यानंतर हाणामारी झाल्याचं पहायला मिळालं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

व्हिडिओ फुटेजमध्ये दिसत आहे की, जमाव एका तरुणाला मारहाण करत आहे. याच दरम्यान नवरदेवही तेथे दाखल होतो. यानंतर गोंधळ इतका होतो की खूपच गर्दी होते आणि मग नेमकं काय सुरु आहे हे व्हिडिओत स्पष्ट दिसत नाही. 

नवरदेवही आपल्या डोक्यावरचा फेटा काढून बाजूला ठेवतो आणि या वादात उडी घेताना दिसत आहे. तर, वधू हा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. एक महिला तर चक्क चप्पलने एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकार?

ही घटना कानपूरमधील बर्रा येथील आहे. या ठिकाणी एका लग्नसोहळ्यात एक तरुण वधूसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. त्याच दरम्यान वधूच्या परिवारातील सदस्यांनी त्याला विरोध केला आणि त्यानंतर गोंधळ सुरु झाला. हा वाद नंतर थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला.

Read More