Marathi News> भारत
Advertisement

प्रवाशांनो लक्ष द्या! तात्काळ तिकीट ते भाडेवाढ..., 1 जुलैपासून बदलणार हे 3 नियम!

Rule Change From July: 1 जुलैपासून रेल्वेचे काही नियम बदलणार आहेत. काय आहेत हे बदल जाणून घेऊयात सविस्तर

 प्रवाशांनो लक्ष द्या! तात्काळ तिकीट ते भाडेवाढ..., 1 जुलैपासून बदलणार हे 3 नियम!

Rule Change From July: प्रत्येक नवीन महिन्याच्या सुरुवातीप्रमाणेच जुलैमध्येदेखील नवीन बदल होणार आहेत. भारतीय रेल्वेकडून अनेक मोठे बदल लागू करण्यात येणार आहेत. याचा थेट परिणाम रेल्वे प्रवाशांवर होणार आहे. तिकीटांच्या दरात वाढ ते तत्काळ बुकिंगसंदर्भातील तीन मोठे बदल जुलै महिन्यात होणार आहे. काय आहे हे नियम जाणून घ्या. 

जुलैचा महिना अनेक मोठे बदल घेऊन येणार आहेत. यात भारतीय रेल्वेसंदर्भातील काही नियम असणार आहेत. महिन्याच्या पहिल्या तारखेला म्हणजे 1 जुलै 2025पासून भारतीय रेल्वे भाडेवाढ वाढवण्याच्या तयारीत आहे. हे दरवाढ किरकोळ स्वरुपाची आहे. नॉन-एसी मेल, एक्स्प्रेस गाड्यांच्या भाड्यामध्ये प्रति किलोमीटर 1 पैशांची वाढ होणार आहे, तर एसी क्लासच्या तिकिटामध्ये प्रति किलोमीटर 2 पैशांची वाढ करण्यात येणार आहे. द्वितीय श्रेणीसाठी 500 किमीपेक्षा जास्त अंतराकरिता प्रति किमी 0.50 पैशांची भाडेवाढ लागू होणार आहे. या निर्णयाची 1 जुलैपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. तूर्तास उपनगरीय रेल्वेचे तिकीट व मासिक पासच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

दुसरा नियम- तात्काळ तिकीट बुकिंग

आता भारतीय रेल्वेच्या तिकीट बुकींगची मर्यादा निश्चित केली जाणार आहे. एकूण तिकीटांच्या केवळ 25 टक्के तिकीटांनाच वेंटीगसाठी ठेवले जाणार आहे. त्यामुळे आता तिकीट कन्फर्म होणार की नाही प्रवास करायचा की नाही या अनिश्चितेतून सुटका होणार आहे. तिकीटांना मर्यादीत वेटींग दिल्याने तिकीट कन्फर्म होण्याची संधी अधिक असणार आहे. तसंच, 1 जुलै 2025 पासून आधार व्हेरिफाइड यूजर्सच आयआरसीटीसी वेबसाइट किंवा अॅपवर तात्काळ तिकीट बुक करू शकणार आहेत. तसंच, भारतीय रेल्वेने बुकिंग एजंट यांच्यावरही काही मर्यादा आणल्या आहेत. एजंट आता बुकिंग विंडोच्या 30 मिनिटे आधी तात्काळ तिकीट बुक करू शकणार नाही. नवीन टायमिंगनुसार, AC Class Ticket साठी सकाळी 10 ते 10.30पर्यंत आणि नॉन एसीसाठी 11 ते 11.30 पर्यंत ही प्रोसेस सुरू असणार. 

तिसरा नियम- ओटीपी ऑथिटिंकेशन

1 जुलै 2025पासून IRCTC रेल्वे तिकीट वेबसाइट किंवा अॅपवरुन तेव्हाच तिकीट बूक होऊ शकतील जेव्हा युजर्सचे आयआरसीटीचे अकाउंट आधार कार्डशी लिंक असेल व व्हेरिफाय आसेल.  त्याव्यतिरिक्त 15 जुलै 2025 पासून तिकीट बुक करताना आधार कार्ड व्हेरिफाय केल्यानंतर आलेला OTPदेखील द्यावा लागेल.

Read More