Marathi News> भारत
Advertisement

रूपयाच्या मूल्यात निच्चांकी घसरण, सामान्यांना मोठा फटका

डॉलरच्या तुलनेत रूपयाची सतत पडझड होत आहे. 

रूपयाच्या मूल्यात निच्चांकी घसरण, सामान्यांना मोठा फटका

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रूपयाची सतत पडझड होत आहे. गुरूवारी रूपयाने रूपया अजूनच ढासळला आहे. हा रूपयाच्या मूल्याचा निच्चांक आहे. क्रुड ऑईलच्या वाढत्या किंमती, महागाई, करंट अकाऊंट डेफिसिट वाढल्याने रूपयांच्या मूल्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे सतत रूपयांचे मूल्य खालावत आहे. 

कशी आहे मूल्यामधील घसरण ? 

गुरूवारी रूपया 28 पैशांनी कमी झाला. डॉलरच्या तुलनेत त्याचा दर 68.89 इतका आहे. एक्सपर्टच्या मते हा दर डॉलरच्या तुलनेत 69 रूपये होऊ शकतो. बुधवारी 19 महिन्यांमधील निच्चांकावर रूपया पोहचला होता. हा 24 नोव्हेंबर 2016 नंतरचा निच्चांक आहे.  

का होतोय रूपयाची घसरण ? 

अमेरिका आणि चीन यामध्ये ट्रेड वॉर सुरू आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे. यासोबतच महिना अखेरीस तेल कंपनी  (HPCL, IOC, BPCL)यांच्याकडून डॉलरची मागणी वाढते. म्हणूनच या महिन्याअखेरीस भारतीय रूपया  अधिक कमजोर झाला आहे. 

सामान्य माणसांवर काय होणार परिणाम? 

रूपया घसरल्याने पेट्रोलियम पोडक्ट्सची आयात महाग होणार आहे. 

तेल कंपन्या पेट्रोल, डिझेलमध्ये वाढ करू शकतात. 

पेट्रोल, डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने महागाईदेखील वाढू शकते. 

खाद्य तेलाप्रमाणेच डाळीदेखील आयात केल्या जातात त्यामुळे त्याच्याही किंमती वाढू शकतात. 

Read More