Marathi News> भारत
Advertisement

युक्रेन युद्धाचे जगासह भारतावरही परिणाम; पंतप्रधान मोदींकडून चिंता वाढवणारे संकेत

Election Results |  bjp won in up | 4 राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे आभार मानले. 

युक्रेन युद्धाचे जगासह भारतावरही परिणाम; पंतप्रधान मोदींकडून चिंता वाढवणारे संकेत

नवी दिल्ली : Modi on Russia Ukraine war: 4 राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांचे आभार मानले. भारतीय लोकशाहीच्या उत्सवाचा हा दिवस आहे अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करतानाच त्यांनी उत्तर प्रदेशातला हा विजय म्हणजे 2024च्या लोकसभा निकालाची नांदी असल्याचं म्हटलं.  परंतू याविषयी बोलताना त्यांनी जागतिक घडामोडींकडेही लक्ष वेधले. आणि येत्या काळात इंधन आणि इतर गोष्टींच्या दरवाढीचे संकेत दिले.

अन्य पक्षांमधील घराणेशाहीवर टीका करताना हे घराणेशाहीचा सूर्यास्त होईल, असं पंतप्रधान म्हणाले. तर भ्रष्टाचारावरील कारवाईला प्रदेश आणि धर्माचा रंग दिला जात असल्याची टीकाही त्यांनी केली. 

त्याच वेळी युक्रेन युद्धामुळे सर्व जगात महागाई भडकल्याचं सांगत पंतप्रधानांनी आगामी दरवाढीचे संकेतही दिलेत. आधी कोविडमुळे जागतिक सप्लाय चैन अडचणीत आली होती. ती सुधारत असताना पुन्हा युद्धामुळे विस्कळीत झाली आहे. त्याच्या परिणाम संपूर्ण जगाच्या अर्थकारणावर होत आहे. त्यामुळे आगामी काळात दरवाढीचे संकेत पंतप्रधान मोदी यांनी दिले.

Read More