Marathi News> भारत
Advertisement

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं अभिनंदन करताना पालयट यांचा गेलहोतांना अप्रत्यक्ष टोला

 राजस्थानमध्ये राजकीय वर्चस्वाची लढाई

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं अभिनंदन करताना पालयट यांचा गेलहोतांना अप्रत्यक्ष टोला

जयपूर : राजस्थानची राजकीय लढाई अजूनही सुरुच आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात वाद कायम आहे. दरम्यान, सचिन पायलट यांनी सीएम गेहलोत यांना लक्ष्य करत काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्षांचे अभिनंदन केले आहे.

सचिन पायलट यांनी ट्विट केले की, गोविंदसिंग डोटासरा यांचे राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल अभिनंदन. मला आशा आहे की कोणत्याही दबाव किंवा पक्षपात न करता, ज्यांनी कठोर परिश्रम घेऊन सरकार स्थापन केले आहे. अशा कार्यकर्त्यांचा आपण मान-सन्मान राखाल ही अपेक्षा.

मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले होते की, जर त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये परत जायचे असेल तर त्यांनी त्यांच्या वर्तनाबद्दल पक्षाच्या हायकमांडकडे दिलगिरी व्यक्त केली पाहिजे.

सीएम गेहलोत यांच्या या विधानापूर्वी पायलट यांनी राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी.पी. जोशी यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विट केले की, सभापतींना मनापासून शुभेच्छा. मी देवाकडे तुमच्या आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो.

Read More