Subrato Roy Passed Away: सहारा इंडिया समुहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांचं मंगळवारी (14 नोव्हेंबर 2023) निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रदीर्घ आजारानं खंगलेल्या रॉय यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण, या आजाराशी सुरु असणारी त्यांची झुंज अखेर संपली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी त्यांचं पार्थिव लखनऊतील सहारा शहरात आणलं जाईल, जिथं त्यांना श्रद्धांजली देण्यात येणार आहे.
12 नोव्हेंबरला प्रकृती अधिक खालावल्यामुळं त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, अखेर त्यांची ही झुंज 14 नोव्हेंबर रोजी रातीर 10 वाजून 30 मिनिटांनी थांबली. 10 जून 1948 ला जन्मलेल्या सुब्रतो रॉय सहारा हे भारतातील एक महत्त्वाचे उद्योजक आणि सहारा इंडिया समुहाचे संस्थापक होते. 'सहाराश्री' अशीही त्यांची एक ओळख.
सहाराश्री सुब्रत रॉय जी का निधन, अत्यंत दुःखद।
— Samajwadi Party (@samajwadiparty) November 14, 2023
ईश्वर उनकी आत्मा को शांति दें।
शोकाकुल परिजनों को ये असीम दुःख सहने का संबल प्राप्त हो।
भावभीनी श्रद्धांजलि ! pic.twitter.com/QO6vAjriAv
बिहार मध्ये जन्मलेले सुब्रतो रॉय पुढे जाऊन देशातील इतके मोठे उद्योजक होती असा कोणी विचारही केला नव्हता. अर्थ, रिअल इस्टेट, मीडिया आणि हॉटेल अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला व्यवसाय मोठा केला. गोरखपूर येथील एका सरकारी संथ्येतून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेणाऱ्या रॉय यांनी व्यवसाय क्षेत्रात उडी मारण्याआधी नमकीन पदार्थ विकण्यापासून सुरुवात केली होती. तुमचा विश्वास बसणार नाही, पण ते चक्क स्कूटरवरून हे काम करायचे.
1976 मध्ये त्यांनी गोरखपूरमधूनच एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. ज्यानंतर त्यांनी चिटफंड कंपनी सहारा फायनान्सला पुढे नेण्यास सुरुवात केली. 1978 पर्यंत त्यांनी या व्यवसायाला सहारा इंडिया परिवारात रुपांतरित केलं आणि पाहता पाहता हा देशातील मोठा उद्योग समूह ठरला.