Marathi News> भारत
Advertisement

सैफुल्लाला धडा शिकवा! पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानचाच; केलं होतं विखारी भाषण

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानचाच एक कुख्यात दहशतवादी असल्याचं आता समोर आलं आहे.   

सैफुल्लाला धडा शिकवा! पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानचाच; केलं होतं विखारी भाषण

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानचाच एक कुख्यात दहशतवादी असल्याचं आता समोर आलं आहे. सैफुल्ला नावाच्या या नराधमानं 4 दिवसापूर्वीच पाकव्याप्त काश्मीरमध्ये 370 कलमावरुन विखारी भाषण केलं होतं. सोबतच TRF या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारीही स्विकारली आहे. त्यामुळे या सैफुल्लाला धडा शिकवण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

तोंडातून विष ओकणारा हाच आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्ला खालिद. या विखारी सैफुल्लाने 4 दिवसांपूर्वीच पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोटमध्ये बैठक घेतली. या बैठकीत सैफुल्लानं चिथावणीखोर भाषण केलं. कलम 370 वरुन सैफुल्लानं पंतप्रधान मोदींचं नाव घेत भारताला धडा शिकवण्याची धमकी दिली. या धमकीनंतर गुप्तचर यंत्रणा सतर्क नव्हत्या का? असा सवाल उपस्थित होत आहे. 


LOC पासून काहीच अंतरावर POKमध्ये दहशतवाद्यांचं तळ 

पहलगाममधील हल्ल्यामागे पाकिस्तानचा सैफुल्ला खालिद उर्फ सैफुल्ला कसूरी हा कुख्यात दहशतवादी आहे

सैफुल्ला लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख, हाफिज सईदचा विश्वासू 

सैफुल्लाचा भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांत हात

जम्मू काश्मीरमध्ये लष्कर, TRFच्या दहशतवादी कारवायांचं संचलन
 
गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, सैफुल्ला सध्या जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर आणि TRF च्या दहशतवादी कारवायांचे संचालन करत आहे.


विशेष म्हणजे एकीकडे पाकिस्ताननं पहलागमधील दहशतवादी हल्ल्यात आमचा काहीही संबंध नाही असा कांगावा केला. तर दुसरीकडे आजच टीआर एफ या संघटनेनं पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्विकारलीय. विशेष म्हणजे पाकिस्तानात टीआरएफकडून अगदी घरं विकून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहिती समोर आलीय. 


TRF संघटनेचे काळे कारनामे

- 2019 साली TRF संघटना अस्तित्वात आली

- TRF म्हणजे 'द रेजिस्टंट फ्रंट', जाणूनबुजून संघटनेला इंग्रजी नाव

- TRFचा लष्कर-ए-तोयबा, पाकिस्तानशी संबंध

- जैश, लष्करच्या दहशतवाद्यांचाच TRFमध्ये सहभाग

- भारतीय सैन्य, नागरिकांच्या हत्येत सहभाग

- सीमेपलीकडून हत्यारे, ड्रग्ज तस्करीतही TRFची मदत


एकीकडे सैफुल्ला आणि टीआरएफचा सहभाग समोर येत असताना 24 तासाच्या आत पहलगाममधील 4 दहशतवाद्यांचा फोटो समोर आलाय. त्यांचं स्केचही आता जारी करण्यात आलंय. 

पहलगाममध्ये 27 पर्यटकांचा नाहक जीव घेणाऱ्यांना आणि दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार, कट रचणा-यांनाही सोडणार नाही असा इशारा आता केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलाय. 

देशातल्या मुस्लिम समाजानंही पहलगामधील या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवलाय. तसंच त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी बंगळुरूतील जामा मस्जिदचे इमाम, मौलाना मकसूद इम्रान रशादी यांनी केलीय 

पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्याच्या 24 तासात सुरक्षा दलांनी 250 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. तर दुसरीकडे या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण जम्मू काश्मीर खो-यात जनतेनं निषेध आंदोलनंही केली. 

पहलगामधील दहशतवादी हल्ल्यातून दहशत माजवण्याचा आणि आपला अजेंडा राबवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाकिस्तानकडून केला जातोय. त्यासाठी सैफुल्ला नावाचं नवं पाकिस्तानं प्यादं वजीर होऊन दहशत माजवू पाहतंय. मात्र भारतही अशा भ्याड हल्ल्यांना भीक घालत नाही. आता सरकारनंही अशा सैफुल्लाच्या मुसक्या आवळून त्याला धडा शिकवणं गरजेचं आहे. जेणेकरुन पुन्हा पाकिस्तानात बसलेल्या या विखारी किड्यांना भारतात येऊन डंख मारायची आणि विष पसरवायची हिम्मत होऊ नये. 

Read More