Marathi News> भारत
Advertisement

Salman Khan च्या जीवाला धोका! मारेकरी हत्यारांसह अभिनेत्याच्या घरात घुसला,पण...

मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलाला सलमान खानला मारण्याचे कामही देण्यात आले होते.

Salman Khan च्या जीवाला धोका! मारेकरी हत्यारांसह अभिनेत्याच्या घरात घुसला,पण...

Salman Khan: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. सलमानला मारण्यासाठी मारेकरी हत्यारांसह अभिनेत्याच्या घरात घुसल्याचा धक्कादायक माहिती समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई-जग्गू भगवानपुरिया (Lawrence Bishnoi-Jaggu Bhagwanpuria) टोळीचा गुंड सलमानला मारण्यासाठी फेब्रुवारीमध्ये (February) मुंबईत (Mumbai) गेला होता.महाराष्ट्रातील (Maharashtra) आणखी दोन बदमाश त्याच्यासोबत होते. यावेळी संधी मिळताच त्याला रेकीही करायची होती आणि सलमानला मारायचे होते. पण त्यांचाकडे सलमान खानबद्दल कुठलीही माहिती देणारा इन्फॉर्मर नव्हता. (Salman Khan kill and delhi police arrests juvenile nmp)

सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी दिल्ली पोलिसांना मोठी माहिती मिळाली आहे. खरं तर, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने 9 मे रोजी मोहालीतील पंजाब पोलीस मुख्यालयावर आरपीजी हल्ल्याप्रकरणी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे, ज्यापैकी एक अल्पवयीन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलाला सलमान खानला मारण्याचे कामही देण्यात आले होते.

सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (Punjabi singer Sidhu Musewala) हत्येनंतर सलमान खानलासुद्धा जीवे मारण्याची धमकी मिळत आहे. नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, सलमान खान गँगस्टरच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका आहे.

fallbacks

सलमान खानला मारण्यासाठी पंजाबमध्ये (Punjab) दीपकला (deepak) शस्त्रे देण्यात आली होती. त्याला अनेक पिस्तुले देण्यात आली. अधिकाऱ्याने सांगितले की, सलमानला मारण्यासाठी लॉरेन्स बिश्रोईने ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात तिहार तुरुंगातून दीपकशी बोलले होते. मोहालीमध्ये (Mohali) रॉकेट लॉन्चर हल्ल्यानंतरच (Rocket Launcher Attack)लॉरेन्सने दीपकला सलमान खानला मारण्यास सांगितले होते. दीपक आणि किशोर (Kishor) इतरांनी मोहालीमध्ये आरपीजी हल्ला केला.

दुसरीकडे ISI-दहशतवादी संघटना BKI आणि लॉरेन्स बिश्नोई टोळी किशोर आणि दीपक सुरखपुरिया यांना दरमहा 50 हजार ते एक लाख रुपये देत होते. पंजाब पोलिसांच्या मोहाली येथील गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर झालेल्या आरपीजी हल्ल्यासाठी त्याला दहा लाख देण्यात आले होते. स्पेशल सेलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आयकेआय दहशतवादी आणि पाकिस्तानात (Pakistan) बसलेल्या हरविंदर सिंग रिंडा याने महाराष्ट्रातील नांदेड (Nanded) येथील बिल्डर संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्याकडे पाच कोटींची खंडणी मागितली होती.

fallbacks

दोघेही मोटारसायकलवरून मोहाली येथील इंटेलिजन्स मुख्यालयाजवळील रिकाम्या प्लॉटवर गेले होते. किशोर आणि दीपक यांनी आरजीपीकडून ग्रेनेड फेकले होते. त्यानंतर ते तेथून पंजाबमार्गे फैजाबाद येथील किशोरच्या घरी गेले. येथे ते बराच काळ लपून राहिले.

Read More