Marathi News> भारत
Advertisement

जेव्हा उ. कोरियाच्या किम जोंगचे पोस्टर केरळमध्ये लागतात...

किम जोंगच्या प्रतिमेचा मोह आता केरळमधल्या कम्युनिस्ट पक्षालासुद्धा होतोय.

जेव्हा उ. कोरियाच्या किम जोंगचे पोस्टर केरळमध्ये लागतात...

कोलकाता : किम जोंगच्या प्रतिमेचा मोह आता केरळमधल्या कम्युनिस्ट पक्षालासुद्धा होतोय.

पोस्टरवर किम जोंग

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटकरून कम्युनिस्ट पक्षावर टिका केली आहे. डावे पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मिसाईल तर सोडण्याच्या विचार नाहीना ! असा टोला त्यांनी कम्युनिस्ट पक्षाला मारला आहे. सोबतच त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचं किम जोंग असलेल्या पोस्टरचा फोटोसुद्धा दिला आहे. 

संघावर मिसाईल

किम जोंगचं पोस्टर कम्युनिस्ट पक्षाचंच असल्याचा दावा करत पात्रा यांनी म्हटलंय, त्यामुळेच कम्युनिस्ट पक्ष केरळमध्ये प्रतिस्पर्धी पक्षाच्या जीवावर  उठलाय याचं आश्चर्य वाटत नाही. डावे पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर मिसाईल तर सोडण्याचा विचार करत नसावेत अशी मी आशा करतो.

राजकीय हिंसाचार

अलीकडच्या काळात भाजप आणि कम्युनिस्ट पक्षाचे राजकीय वाद टोकाला जाऊन तिथे मोठ्या प्रमाणावर राजकीय हिंसाचार घडला होता. त्यानंतर भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी केरळमध्ये दौरे केले होते. भाजपने केरळमध्ये 'जन रक्षा यात्रा' सुद्धा काढली होती. त्या पार्श्वभूमीवर संबित पात्रा यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

Read More