Marathi News> भारत
Advertisement

जिलेबी, समोसा आणि लाडू सिगरेट इतकेच धोकादायक; आरोग्य मंत्रालयाने दिला हादरवणारा इशारा

Health Ministry: आरोग्य मंत्रालयाने एक अहवाल जारी केला आहे. 2050 पर्यंत देशात 44.9 कोटी लोक लठ्ठपणाचा सामना करत आहेत.

जिलेबी, समोसा आणि लाडू सिगरेट इतकेच धोकादायक; आरोग्य मंत्रालयाने दिला हादरवणारा इशारा

Health Ministry: समोसा-जिलेबी आणि लाडू आवडीने खाणाऱ्या खवय्यांना अलर्ट होण्याची गरज आहे. आता खाण्या-पिण्याच्या प्रत्येक पदार्थांवर वॉर्निंग स्लिप देण्यात येणार आहे. ज्यावर त्या पदार्थात असलेली साखर आणि किती तेल वापरलंय याची माहिती दिली जाणार आहे. आरोग्य मंत्र्यालयाने सर्व केंद्रीय संस्थांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यात नमूद करण्यात आलं आहे की, सर्व खाद्यपदार्थांवर तेल आणि साखरेचे प्रमाण नमूद करण्यात यावे. जेणेकरुन तुम्हाला नाश्त्यातील फॅट आणि शुगरची योग्य माहिती मिळू शकेल.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालयाने एक अहवाल तयार केला आहे. यात 2050 पर्यंत देशात 44.9 कोटी लोक लठ्ठपणाचे शिकार होतात. अशात भारत अमेरिकानंतरचा दुसरा देश ठरेल जो लठ्ठपणाशी झुंजतोय. सध्या भारतात पाचपैकी एक व्यक्ती लठ्ठपणाने ग्रासली आहे. अशातच लोकांना जंक फुडबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरुवातीला सरकारी संस्थांमध्ये लागू करण्यात येणार आहे. खाद्य पदार्थांमध्ये तेल आणि शुगर यांचे प्रमाण असलेले लेबलमुळं लोकांना इशारा मिळेल की ते अनहेल्दी पदार्थ खातातयत.

World Health Organization (WHO) 2024 च्या रिपोर्टनुसार, भारतात 60 टक्के लोक लठ्ठपणा आणि वाढते वजन यामुळं ग्रासले आहेत. तर, मधुमेहाचे प्रकरण 2030 पर्यंत 10 कोटींचा आकडा पार करू शकतात. याच कारणामुळं आरोग्य मंत्रालयाने खाद्य आणि औषधी प्रशासन (FSSAI) सोबत मिळून एक निती तयार केली आहे. त्याअंतर्गंत या खाद्यपदार्थांच्या पॅकिजिंगवर वॉर्निंग लेबल लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.

एम्स नागपूरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालयाकडून या संबंधी आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर कॅफेटेरिया आणि पब्लिश पॅसेजवर वॉर्निंग बोर्डस लावण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त, तपासणीत समोसा, जिलेबी, आणि लाडू इतकंच नव्हे तर वडा पाव आणि भजीदेखील या यादीत जोडण्यात येणार आहेत. कार्डियोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाच्या नागपुर विभागाची वरिष्ठ डॉ. अमर आमले यांनी या प्रकरणात काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, शुगर आणि ट्रान्स फॅट नवीन युगातील सिगारेट आणि तांबाखू आहेत. शुगर आणि ऑइल यामुळं खाद्यपदार्थ स्मोकिंग आणि तंबाखुइतकेच धोकादायक आहेत. एखादे खाद्यपदार्थ जितके नुकसानदायक आहेत तितकेच त्यांची लेबलिंग असणार आहे. लोकांना कळलं पाहिजे की ते काय खातात?

Read More