Marathi News> भारत
Advertisement

7th Pay Commission मुळं सरकारी कर्मचाऱ्यांना दणका; पगाराचा आकडा कमी होणार?

7th Pay Commission: का कमी होणार सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार? यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती... कोणावर होणार सर्वाधिक परिणाम....   

7th Pay Commission मुळं सरकारी कर्मचाऱ्यांना दणका; पगाराचा आकडा कमी होणार?

7th Pay Commission: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगाराचे भत्ते आणि विविध वेतन आयोग हे अतिशय जिव्हाळ्याचे विषय. याच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी नुकतीच समोर आली आहे. या बातमीमुळं शासकीय अख्तयारित येणाऱ्या विभागांमध्ये सेवेत असणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांची निराशा होऊ शकते. कारण, आहे ते म्हणजे पगाराच्या आकड्यात होणारी घट. 

मागील काही दिवसांपासून महागाई भत्ता (DA) आणि DR मध्ये किमान 2 टक्क्यांनी वाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती, ज्यानंतर हा आकडा 55 टक्क्यांवर पोहोचला. पण, आता 2025 मधील पहिल्या तीन महिन्यांतील महागाई दरात झालेली घट पाहता पुढील महागाई भत्तेवाढीचा आकडा 2 टक्के किंवा त्याहून कमीसुद्धा असू शकतो. ज्यामुळं जुलै- डिसेंबर 2025 दरम्यान चांगल्या महागाई भत्तेवाढीची अपेक्षा बाळगणाऱ्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांची निराशा होणार आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे ही चालू वेतन आयोगाची अर्थात सातव्या वेतन आयोगाली अखेरची महागाई भत्तेवाढ असून या आयोगाचा 10 वर्षांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी पूर्ण होत आहे. ज्यानंतर नव्यानं गठित करण्यात आलेल्या आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी मिळाली असून, त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची शिफारस केली जाईल. 

डीएमध्ये घट का झाली?

2025 मधील पहिल्या दोन महिन्यांमध्ये  AICPI-IW  च्या आकडेवारीमध्ये घट झाल्याची बाब समोर आली. ज्या कारणास्तव जुलै- डिसेंबर 2025 दरम्यानच्या कालावधीसाठी डीएच्या आकड्यांमध्ये घट पाहायला मिळू शकते. AICPI-IW हा महागाई भत्ता निर्धारित करण्यासाठीचा एक महत्त्वाचा निकष असून कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार फेब्रुवारीमध्ये AICPI-IW 0.4 घट होत तो 142.8 वर पोहोचला. तर, जानेवारीमध्ये ही आकजेवारी 143.2 इतकी असल्याचं लक्षात आलं.

हा एक सूचकांक असून प्रत्येक महिन्याला कामगार मंत्रालयाकडून त्याबबातची आकडेवारी जारी केली जाते. त्यामुळं सूचकांकात घट झाल्यास डीए हाईक अर्थात महागाई भत्त्यात फारशी वाढ होत नाही. त्यामुळं सलग चार महिन्यांसाठी  AICPI-IW च्या आकडेवारीमध्ये घट आढळली तर, कर्मचाऱ्यांना 2 टक्के किंवा त्याहून कमी भत्तेवाढ लागू होते. परिणामी पूर्णत्वाच्या मार्गावर असणाऱ्या सातव्या वेतन आयोगातून अपेक्षित वाढ झाली नाही, तर मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या सर्वच अपेक्षा आठव्या वेतन आयोगाकडून असतील असं सांगण्यात येत आहे. 

Read More