Video Shows Husband Being Slapped By Wife: देशातील वेगवेगळ्या भागांमधून मागील काही दिवसांपासून सातत्याने पुरुषांवर त्यांच्याच पत्नीकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या बातम्या समोर येत आहेत. मेरठमधील सौरभ भारद्वाज हत्याकांडानंतर पतीवरील हल्ला आणि छळाच्या अनेक बातम्या समोर आल्यानंतर आता मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आपल्या आईसमोरच पतीला बेदम मारहाण करताना दिसत आहे. आई आणि भाऊ समोर असताना ही महिला पतीला मारहाण करताना दिसतेय. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीला मारहाण झाली तो रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून काम करतो.
मध्य प्रदेशातील सतनामध्ये राहणाऱ्या या लोको पायलटने त्याच्यावर पत्नीकडून होणाऱ्या अत्याचाराचं स्टींग ऑपरेशन करुन हा धक्कादायक घटनाक्रम छुप्या कॅमेरात कैद केला आहे. या लोको पायलेटचा त्याच्या पत्नीबरोबर वाद झाला. यानंतर या महिलेने तिच्या पतीला बेदम मारहाण केली. पत्नी छळ करते, मारहाण करते म्हणून या लोको पायलटने तिचे कृत्य जगासमोर आणण्याचं ठरवलं. त्याने स्वत:च्या खोलीत एक छुपा कॅमेरा बसवला होता. या कॅमेरामध्ये कैद झालेला पतीला मारहाण केल्याचा व्हिडीओ आता व्हायरल होतोय. आई आणि भावा समोरच ही महिला तिच्या पतीला मारहाण करताना दिसते आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडीओत मार खाताना दिसणारा लोको पायलेट त्याच्या पत्नीच्या छळाला कंटाळला आहे. त्याने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रारही केली होती. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे त्याने शेवटी आपल्या खोलीमध्ये छुपा कॅमेरा बसवला आणि त्यामध्ये हा संपूर्ण घटनाक्रम रेकॉर्ड झाला. हा सारा प्रकार 20 मार्च रोजी घडल्याचं सांगितलं जात आहे.
हा लोको पायलट त्याच्या पत्नीच्या छळाला कंटाळला आहे. त्याने यासंदर्भात पोलिसात तक्रारही केली. मात्र काहीही उपयोग झाला नाही, त्यामुळे त्याने शेवटी खोलीत छुपा कॅमेरा बसवला. या कॅमेरात ही सगळी घटना कैद झाली आहे आणि हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या पीडित लोको पायलटचं नाव लवकेश असं आहे. लवकेशची सासूही नवऱ्याला मारहाण करु नकोस असं मुलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. मात्र त्याच्या पत्नीने आईचं काहीही ऐकलं नाही. पत्नी लवकेशच्या छातीवर लाथा बुक्क्यांनी मारहाण करताना या छुप्या कॅमेरामधील व्हिडीओत दिसत आहे.
In Satna, MP, a viral video shows loco pilot Lokesh being slapped by his wife, recorded secretly on March 20. He filed a complaint the next day at Kotwali police station, and a case was registered.#Satna #ViralVideo #Assault #Lokesh #PoliceCase pic.twitter.com/eeznhOk8dh
— First India (@thefirstindia) April 2, 2025
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता सतना येथील पोलीस ठाण्यात तक्रारही नोंदवण्यात आली आहे.