Marathi News> भारत
Advertisement

Schocking VIDEO: हवेतच पाळण्याचे 2 तुकडे, लोकं उंचावरुन जमिनीवर आपटले, अंगावर काटा आणणारा क्षण कॅमेरात कैद!

Saudi 360 Ride collapses: व्हायरल व्हिडिओमध्ये एक '360 डिग्री' झुला दिसतोय, जो पूर्ण वेगात झुलत असताना अचानक तुटतो. 

Schocking VIDEO: हवेतच पाळण्याचे 2 तुकडे, लोकं उंचावरुन जमिनीवर आपटले, अंगावर काटा आणणारा क्षण कॅमेरात कैद!

Saudi 360 Ride collapses: लहानपणी झुल्यावर झुलताना मनात नेहमी एक भीती असते की, हा झुला कुठे तुटला तर? किंवा आपण खाली पडलो तर? पण जेव्हा ही भीती खऱ्या आयुष्यात प्रत्यक्षात उतरते, तेव्हा काय होतं? असाच एक धक्कादायक प्रकार सौदी अरबच्या हदा भागातील ग्रीन माउंटेन पार्कमध्ये घडला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहून खरंच हृदय धडधडायला लागतं. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

काय आहे या व्हिडिओमध्ये?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक '360 डिग्री' झुला दिसतोय, जो पूर्ण वेगात झुलत असताना अचानक तुटतो. या अपघातात किमान 23 जण जखमी झाले आहेत. व्हिडिओमध्ये दिसतं की, झुल्यावर बसलेले लोक आनंदाने झुलत होते, तेवढ्यात झुल्याचा मधला मोठा खांब अचानक तुटला. झुल्याचा जड भाग मोठ्या आवाजासह खाली कोसळला आणि त्यावर बसलेले लोक, जरी ते सीटबेल्टने बांधलेले असले तरी, वेगाने खाली पडत गेले. 

घटनास्थळावरील भयानक दृश्य

प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, खांब इतक्या वेगाने तुटला की, त्याच्या धक्क्याने दुसऱ्या बाजूला बसलेल्या लोकांनाही दुखापत झाली. काही लोक झुला कोसळल्याने दूर फेकले गेले आणि त्यांनाही जखमा झाल्या. या अपघातामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

पोलिसांचा तपास सुरू

या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हा झुला पूर्णपणे बंद करण्यात आला असून, संपूर्ण ग्रीन माउंटेन पार्कच्या सुरक्षेचीही तपासणी केली जात आहे. 

सोशल मीडियावर संताप

हा व्हिडिओ @MiddleEast_24 या अकाऊंटवरून एक्सवर शेअर करण्यात आला आहे, जो प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर लोक पार्क प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणावर जोरदार टीका करत आहेत. एका युजरने लिहिलं, “या लोकांच्या बेजबाबदारपणामुळे कित्येक लोकांचा जीव धोक्यात आला.” दुसऱ्या एका युजरने म्हटलं, “लहानपणीची भीती आज खरंच प्रत्यक्षात उतरली.” तर एकाने लिहिलं, “हे लोक नशीबवान होते की झुला उलटला नाही, नाहीतर आणखी मोठा अनर्थ झाला असता.”

Read More