Marathi News> भारत
Advertisement

Saurabh Rajput Murder Case: आरोपी मुस्कान पोलीस अधिकाऱ्याबरोबर नको त्या आवस्थेत आढळली?

Saurabh Rajput Meerut Murder Case: या प्रकरणामध्ये मयत सौरभची पत्नी आणि तिचा प्रियकर पोलिसांच्या ताब्यात आहे.

Saurabh Rajput Murder Case: आरोपी मुस्कान पोलीस अधिकाऱ्याबरोबर नको त्या आवस्थेत आढळली?

Saurabh Rajput Meerut Murder Case: उत्तर प्रदेशातील मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु असतानाच एका वेगळ्याच कारणामुळे या प्रकरणातील प्रमुख आरोपी मुस्कान रस्तोगी चर्चेत आली आहे. आपल्या पतीची निर्घृणपणे हत्या करणारी पायल एक कथित एआय व्हिडीओमध्ये पोलीस अधिकाऱ्याबबरोबर नको त्या अवस्थेत दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. मात्र हा व्हिडीओ एआय म्हणजेच आर्टिफिशीएअल इंटेलिजन्सचा वापर करुन तयार करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. 

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर व्हायरल व्हिडीओ हा एआय तंत्रज्ञान वापरुन तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रस्तोगी आणि ब्रम्हपुरी पोसी स्टेशनमधील प्रमुख पोलीस अधिकारी रमाकांत पाचुरी हे नको त्या अवस्थेत एकमेकांसोबत असल्याचं दाखवण्यात आल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलं आहे. चुकीच्या हेतूने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. हा व्हिडीओ कोणी तयार केला आणि व्हायरल केला याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

कुठून व्हायरल झाला व्हिडीओ?

ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमधील करमवीर सिंह यांनी तक्रार दाखल केली आहे. 'प्रियांशु' नावाच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन हा चुकीचा आणि एआय जनरेटेड व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याचं म्हटलं आहे. पोलीस अधिकाऱ्याची प्रतिमा हनन करण्याच्या उद्देशाने हा व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याचं म्हटलं आहे.

लवकरच अटक करु

पोलीस अधिकक्षक आय़ुष सिंह यांनी, "वरिष्ठ उप-पोलीस निरिक्षकांच्या तक्रारीवरुन एफआयआर दाखल करुन घेण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत येणाऱ्या कलम 67 अंतर्गत तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे. हे व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांना लवकरच अटक केली जाईल," असा विश्वास व्यक्त केला आहे.

इतरही फोटो, व्हिडीओ व्हायरल

अशाचप्रकारे मुस्कान आणि तिचा प्रियकर साहील शुक्ला यांचेही नको त्या अवस्थेतील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून हे व्हिडीओ तयार करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. मात्र या व्हिडीओंमुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे हे मात्र नक्की.

Read More