Marathi News> भारत
Advertisement

SBI ची ग्राहकांसाठी होमलोनवर जबरदस्त ऑफर

 भारतीय स्टेट बँक (SBI) ची जबरदस्त ऑफर्स 

SBI ची ग्राहकांसाठी होमलोनवर जबरदस्त ऑफर

मुंबई : जर आपण सणाच्या हंगामात घर विकत घेण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी आपल्यासाठी फायद्याची असू शकते. देशातील सर्वात मोठी भारतीय स्टेट बँक (SBI) सणाच्या हंगामासाठी जबरदस्त ऑफर्स घेऊन आली आहे. आपल्याला होमलोनसाठी ही बँक ऑफर देत आहे. सोबत अनेक आकर्षक योजना आहेत ज्या आपल्याला फायदेशीर ठरतील.

प्रोसेसिंग फीमध्ये 100% सूट

सणासुदीच्या हंगामात घर खरेदीदारांसाठी गृह कर्जाच्या प्रक्रियेच्या शुल्कामध्ये एसबीआयने 100 टक्के सूट जाहीर केली आहे. म्हणजेच कोणत्याही गृह कर्जासाठी आता प्रोसेसिंग फी द्यावी नाही लागणार.

25 बेस पॉईंट अतिरिक्त सूट

एसबीआय 6.90 टक्के च्या दराने गृहकर्ज देत आहे. परंतु या उत्सवाच्या हंगामात बँकेने 25 बेस पॉईंट्सवर अतिरिक्त सूट जाहीर केली आहे. म्हणजेच या वेळी एसबीआयकडून गृहकर्ज घेणाऱ्या लोकांना 6.65 च्या दराने व्याज द्यावे लागेल.

Yono App वर सवलत

बँकेने असे म्हटले आहे की, जर ग्राहक एसबीआय योनो अॅपद्वारे होमलोनसाठी अप्लाय करत असेल तर त्याला स्वतंत्रपणे काही सवलती देण्यात येतील.

Read More