Marathi News> भारत
Advertisement

मनोरंजनासाठी पत्ते खेळताय? महत्त्वपूर्ण निरीक्षणासह सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Supreme Court : देशातील सर्वोच्च न्यायव्यवस्था म्हणून पाहिल्या जाणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं नुकताच एक लक्षवेधी निकाल दिला. काय आहे हा निकाल? पाहा...

मनोरंजनासाठी पत्ते खेळताय? महत्त्वपूर्ण निरीक्षणासह सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल

Supreme Court : मनोरंजनासाठी खेळला जाणारा पत्त्यांचा डाव अनैतिक नसल्याचं स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलं आहे. केवळ मनोरंजनासाठी पत्ते खेळणं ही अनैतिक बाब नाही असा स्पष्ट निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयानं दिला. जर जुगार किंवा सट्टेबाजीचा भाग नसेल आणि केवळ मनोरंजनासाठी पत्ते खेळले जात असतील, तर ते अनैतिक वर्तन मानता येणार नाही, असा निकाल SC नं जारी करत हनुमंतरायप्पा नामक व्यक्तीला दिलासा दिला.

कर्नाटकातील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या संचालक मंडळावर नियुक्त झालेल्या हनुमंतरायप्पा वाय.सी. यांना, रस्त्याच्या कडेला काही मित्रांसह पत्ते खेळताना पाहिलं गेलं आणि त्यामुळं त्यांना 200 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता आणि त्यांची निवडही रद्दबातल ठरवण्यात आली होती. मात्र, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्या. एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने त्यांच्यावरील कारवाई रद्द करत पद त्यांना पुन्हा बहालकरावं असं स्पष्च केलं.

न्यायालयानं नोंदवलेलं निरीक्षण...

  • प्रत्येक आक्षेपार्ह वर्तनात नैतिक अधःपतन असतेच असे नाही.
  • नैतिक अधःपतन म्हणजे नीच, भ्रष्ट किंवा अश्लील वर्तन असले पाहिजे.
  • भारतात पत्ते खेळणे हा अनेक गरीब व मध्यमवर्गीय लोकांसाठी सामान्य आणि सुलभ मनोरंजनाचा मार्ग आहे.

हेसुद्धा वाचा : Maharashtra weather News : दुपटीनं बरसणार पाऊसधारा! मान्सूनच्या येण्यानं नेमकं काय बदलणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त  

सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानुसार हनुमंतरायप्पा यांची हकालपट्टी त्यांच्या कृतीच्या तुलनेत खूपच कठोर आणि अन्यायकारक होती. त्यामुळे कर्नाटक उच्च न्यायालयाचा निकाल रद्द करत त्यांना पुन्हा त्यांच्या पदावर बहाल करण्यात यावं असं स्पष्ट करत त्यांनी दिलेल्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाचं आवाहन सर्वोच्च न्यायालयानं स्वीकारलं आणि महत्त्वपूर्ण निकाल दिला.

Read More