Marathi News> भारत
Advertisement

शाळेत पाण्याच्या टाकीत मिसळले होतं विष पण कर्मचार्‍याच्या प्रसंगावधाने बचावले प्राण

शाळेत काम करणार्‍या एका सफाईकामगाराच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.

शाळेत पाण्याच्या टाकीत मिसळले होतं विष पण कर्मचार्‍याच्या प्रसंगावधाने बचावले प्राण

तामिळनाडू : शाळेत काम करणार्‍या एका सफाईकामगाराच्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.

नागाम्मलच्या या कार्याचा गौरव प्रजासत्तकदिनी एका कार्यक्रमात करण्यात आला.  

नेमके घडले काय ? 

तामिळनाडूतील नागप्पट्टिनम येथील एका प्राथमिक शाळेमध्ये पाण्याची टाकी साफ करण्यासाठी काही विषारी घटकांचा वापर करण्यात आला होता. 

गुरूवारी प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी पोहचलेल्या सफाईकर्मचार्‍याने पाण्याचा नळ उघडला तेव्हा त्याला पाण्याच्या रंगामध्ये आणि वासामध्ये काही बदल आढळला. 

सफाई कर्मचार्‍याने त्वरीत प्रसंगावधान राखत सारा प्रकार पर्यवेक्षकाला सांगितले. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलिसांना याबाबत माहिती दिली. 

पोलिस  तपासामध्ये पाण्याच्या टाकीजवळ क्लोरोएसेटिनिलिड हर्बिसाइडचा डबा आढळला. त्यावरून विषारी घटक पाण्यात मिसळल्याचे त्यांच्या लक्षात आले.  

कार्याचा गौरव  

नागाम्मल याच्या उल्लेखनीय कामाची दखल घेत त्याला गौरवण्यात आले. आरोग्यविभागाच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दुषित पाणी जर शरीरात गेले असते तर आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम होण्याची शक्यता होती. तसेच विषारी घटक असल्याने हे पाणी जीवघेणेदेखील ठरू शकले असते.  

Read More