Marathi News> भारत
Advertisement

काश्मीरमध्ये ७ महिन्यानंतर शाळा सुरु, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

 कश्मीरमध्ये पुन्हा शाळांमधली किलबिल सुरू झाली आहे. 

काश्मीरमध्ये ७ महिन्यानंतर शाळा सुरु, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

श्रीनगर : कश्मीरमध्ये पुन्हा शाळांमधली किलबिल सुरू झाली आहे. आपल्याकडे उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात, तशा काश्मीरमध्ये थंडीच्या सुट्ट्या असतात. त्या कधीच संपल्या होत्या. पण ५ ऑगस्टला जम्मू आणि कश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर गेले सात महिने शाळा बंद होत्या. पण आता शाळा सुरू झाल्या आहेत. पहिल्याच दिवशी शाळेत भरपूर उत्साह दिसून आला. 

शाळा सुरू झाल्यानं मुलांमध्ये आनंद दिसत आहे. वर्ग विद्यार्थ्यांनी भरले होते. मुलांमध्ये एक वेगळा उत्साह दिसत होता. विद्यार्थीच नाही तर शिक्षकही उत्साही होती. त्याने उत्साहाने विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. 

सरकारने श्रीनगर नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवल्या आहेत. काश्मीरमध्ये १०.३० ते ३.३० वेळ ठेवण्यात आली आहे. काश्मीरमध्ये धारा १४४ लागू असल्याने अनेक दिवस शाळा बंद होत्या. अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये हिंसा होऊ नये म्हणून सरकारने आधीच तयारी केली होती. त्यामुळे शाळाही बंद होत्या.

७ महिन्यानंतर आता जनजीवन हळूहळू सुरळीत झालं असून परिस्थिती सामान्य आहे. 

Read More