Marathi News> भारत
Advertisement

अर्रर्र कॅमेरा सुरू आहे...; लाइव्ह असतानाच रोमँटिक झाले सचिन-सीमा, Video Viral

Sachin -Seema Video: सचिन आणि सीमा हैदर यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लाइव्ह शो सुरू असतानाच दोघेही रोमँटिक झाल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळतेय 

अर्रर्र कॅमेरा सुरू आहे...; लाइव्ह असतानाच रोमँटिक झाले सचिन-सीमा, Video Viral

Sachin -Seema Video Viral: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरमुळं देशात चांगलीच चर्चा रंगली होती. नोएडा येथे राहणाऱ्या सचिन मीणा नावाच्या तरुणासोबत पबजी खेळता खेळता ती प्रेमात पडली त्यानंतर पाकिस्तानची सीमा ओलांडत ती चार मुलांसह भारतात आली. सीमा भारतात आल्यानंतर मोठा गदारोळ माजला होता. सीमा हैदर आणि सचिन यांचे फोटो व्हिडिओही सोशल मीडियात ट्रेंड होत असतात. अशातच सीमा आणि सचिनचा एक व्हिडिओ चांगलाच गाजतोय. या व्हिडिओत सचिन आणि सीमा एका न्यूज चॅनेलला लाइव्ह मुलाखत देत होते. त्याचवेळी सचिन भलताच रॉमॅंटिक झाला शेवटी अँकरलाच मध्ये पडत कॅमेरा सुरू आहे याची आठवण करुन द्यावी लागली. 

भारतात आल्यानंतर सचिन आणि सीमा हैदर यांनी अनेक वृत्त वाहिन्यांना मुलाखती दिल्या. सीमा पाकिस्तानची हेर असल्याचा आरोपही करण्यात आला. मात्र, प्रत्येकवेळी सीमाने सचिनवर ती किती प्रेम करते याचे स्पष्टीकरण देत राहिली. अशातच एका लाइव्ह शो दरम्यान असं काही घडलं की लोकांनी त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. 

लाइव्ह टीव्हीवर रोमान्स

लाइव्ह शोसाठी सचिन आणि सीमा यांच्यासोबत चॅनलचा अँकर आणि त्यांचे वकील उपस्थित होती. कार्यक्रमात चर्चा सुरू असतानाच अचानक सचिन  आणि सीमा रोमॅटिक झाले. याचवेळी टिव्हीवर त्यांचे वकीलही उपस्थित होते. व्हायरल व्हिडिओनुसार, सचिन सीमा हैदरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे त्याचवेळी अँकरमध्ये पडतो व म्हणतो की सचिन जी कॅमेरा सुरू आहे. त्याचवेळी सीमाही सचिनला दूर ढकलते. 

लाइव्ह शो सुरू असतानाच अचानक घडलेल्या या प्रसंगाने सचिन आणि सीमा दोघेही लाजताना दिसत आहेत. त्याचवेळी दोघांचे वकिल त्यांच्या या वागण्याचे समर्थन करत त्यांचा बचाव कराताना दिसत आहेत. त्यांचे वकील म्हणातामा दिसत आहेत की, त्यांचे प्रेम अमर आहे. मग कॅमेऱ्याच्या मागे असो की समोर. 

सचिन आणि सीमाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. काही जण सचिनला नॉटी म्हणत आहेत. तर, सोशल मीडियावरही काही युजर्स व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स करत आहेत. 

Read More