Marathi News> भारत
Advertisement

Serum Vaccine : केंद्र सरकारच्या सूचनेनंतर सीरमने कोविशील्ड लसीची किंमत केली कमी

केंद्र सरकारने सोमवारी सीरम इंस्टीट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांकडे कोविड-19 लसीच्या किंमती कमी करण्याची मागणी केली होती.   

Serum Vaccine : केंद्र सरकारच्या सूचनेनंतर सीरमने कोविशील्ड लसीची किंमत केली कमी

पुणे : केंद्र सरकारने सोमवारी सीरम इंस्टीट्यूट (serum institu te of india)आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) या कंपन्यांकडे कोविड-19 लसीच्या किंमती कमी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज सीरम इंस्टीट्यूटचे आदर पुनावाला ( adar poonawalla ) यांनी लसीच्या किंमती कमी करत असल्याचं जाहीर केलं आहे. 

पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने आपली कोविशिल्ड राज्यांसाठी 400 रुपयांवरुन 300 रुपये प्रति डोस वर आणली आहे. याचा अर्थ राज्य सरकारसाठी आता ती 300 रुपयात मिळणार आहे. (Covishield vaccine rate)

देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील व्यक्तींना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्यामुळे लसीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. कोरोना लसीसाठी नोंदणी सुरु झाली आहे. ज्यांना लस घ्यायची आहे. त्याने आधी लसीसाठी नोंदणी करणे आवश्यक असणार आहे.

Read More