Marathi News> भारत
Advertisement

भाजपसोबत जाणार नाही, मविआ कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा सत्तेत येईल - पवार

Sharad Pawar यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान मोदींसोबतच्या भेटीबाबत त्यांनी माहिती दिली.

भाजपसोबत जाणार नाही, मविआ कार्यकाळ पूर्ण करुन पुन्हा सत्तेत येईल - पवार

नवी दिल्ली : आज दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी लक्षद्विपचे राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद के फैजल यांच्यासह शरद पवार पत्रकार परिषदेस संबोधित करत होते. (Sharad Pawar Press Conference)

पंतप्रधानांकडे काय केली तक्रार?

लक्षद्विपचा प्रशासक म्हणनू चार्ज प्रफुल्ल के पटेल यांच्याकडे आहे. तिथे प्रशासकडून त्रास दिला जातो आहे. आधी सुरू असलेले प्रोजेक्ट बंद करून नवे प्रोजेक्ट सुरू केले. स्थानिकांचा विरोध असतानाही त्यांच्या जमीनीवर प्रोजेक्ट सुरू केले. विकासाच्या नावाखाली जमीन बळकावण्याचा प्रकार सुरू आहे. वैद्यकीय समस्या खूप आहेत. डॅाक्टर लवकर मिळत नाहीत. एका बेटावरून दुस-या बेटावर जाण्यास डॅाक्टरांना वेळ लागतो. या मुद्द्यांवर शरद पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली.

संजय राऊत ईडी कारवाईवर प्रतिक्रिया

राज्यपालांकडे दोन वर्षापूर्वी 12 आमदारांकडे महाराष्ट्र सरकारने यादी दिली. पण त्यावर राज्यपालांनी सही केली नाही. संजय राऊत राज्यसभा सदस्य आहेत. त्यांची अर्धा एकर अलिबाग मध्ये जागा आहे. ती जप्त केली. यांवर चर्चा केली. संजय राऊत यांच्यावरील कारवाईची जबाबदारी केंद्र सरकारला घ्यावी लागेल. संजय राऊत प्रकरणात उद्धव ठाकरेंशी बोललो नाहीये. अधिवेशन संपल्यावर मुख्यमंत्र्यांशी मुंबईत चर्चा करेन. असं ही पवार म्हणाले.

भाजपसोबत जाणार नाही

कोणाच्या सांगण्यावरुन राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार नाही. महाविकासआघाडी उत्तम काम करत असून 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल. 5 वर्ष पूर्ण करुन महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास देखील पवारांनी व्यक्त केला.

Read More