Marathi News> भारत
Advertisement

केंद्र सरकारच्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार

 सरकारने बोलविलेल्या बैठकीवर शिवसेना बहिष्कार टाकणार नाही.

केंद्र सरकारच्या बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : सोमवार पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्त लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. तर उद्या सरकारतर्फे बैठक बोलविली आहे. या दोन्ही बैठकीला शिवसेना उपस्थित राहणार आहे. सरकारने बोलविलेल्या बैठकीवर शिवसेना बहिष्कार टाकणार नाही.

अधिवेशन सुरळीत चालविण्यासाठी अध्यक्ष ओम बिर्ला विविध पक्षांच्या नेत्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करतील. शिवसेना एनडीएतून बाहेर पडली असल्यामुळे शिवसेना या बैठकीला उपस्थित राहील का याकडे लक्ष लागले होते. शिवसेना हिवाळी अधिवेशनात केंद्र सरकारच्या कारभाराविरुद्ध आक्रमक रूप धारण करतेय का, हे पहावं लागणार आहे. हिवाळी अधिवेशन १३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

Read More