Marathi News> भारत
Advertisement

बापरे! पाच वर्षांच्या मुलाने चॉकलेट समजून खाल्या सेक्स पॉवरच्या गोळ्या, आणि मग घडलं असं काही...

घरात असलेल्या सेक्सपॉवरच्या गोळ्या मुलाने खाल्ल्या, पण त्यानंतर... डॉक्टरही झाले अवाक  

बापरे! पाच वर्षांच्या मुलाने चॉकलेट समजून खाल्या सेक्स पॉवरच्या गोळ्या, आणि मग घडलं असं काही...

बिहार :  एका पाच वर्षाच्या मुलाने चॉकलेट समजून सेक्स पॉवर वाढवण्याच्या चार गोळ्या खाल्ल्या. यानंतर काही वेळाने त्याची प्रकृती बिघडू लागली. मुलाला चक्कर आल्यासारखं वाटू लागलं आणि तो रडायला लागला. त्याची परिस्थिती पाहून आई-वडिल घाबरले. त्यांनी तात्काळ त्या मुलाला रुग्णालयात नेलं. बिहारमधील खगरियामध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुलाने खाल्ल्या मॅनफोर्सच्या गोळ्या
ही घटना 26 फेब्रुवारीची आहे. खगरिया सदर रुग्णालयाचे डॉक्टर बरकत अली यांच्यासमोर असं पहिलंच प्रकरण आल्याने तेही अचंबित झाले. मुलाच्या पालकांनी त्यांना घडलेली परिस्थिती सांगितली. घरात ठेवलेल्या मॅनफोर्सच्या गोळ्या मुलाने चॉकेलेट म्हणून खाल्ल्याचं त्यांनी सांगितलं. एकाचवेळी मुलाने चार गोळ्या घेतल्या, यानंतर मुलाची तब्येत बिघडली. मुलाच्या प्राइवेट पार्टला समस्या निर्माण झाली. अंगातून घाम येऊ लागल्याचं पालकांनी सांगितलं. 

मुलांच्या पालकांचं म्हणणं ऐकल्यानंतर डॉक्टरही अवाक झाले. त्यांच्याकडे अशी पहिलीच केस होती. डॉक्टर बरकत आली यांनी तातडीने एम्समधल्या चाईल्ड स्पेशलिस्टला फोन करुन संपूर्ण प्रकरण त्यांच्या कानावर घातलं. यावर त्यांनी देशी इलाज सुचवला. मुलाला काहीही करुन उलटी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. 

उलटी झाल्यानंतर प्रकृती सामान्य
एम्सच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर मुलाला मिठाचं पाणी पिण्यास दिलं, त्यामुळे मुलाला उलट्या झाल्या. यानंतर सुमारे एक तास मुलाला देखरेखीखाली ठेवण्यात आलं. मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला आई-वडिलांसह घरी पाठवण्यात आलं. 

Read More