Marathi News> भारत
Advertisement

हनिमूनच्या रात्री नवऱ्याने नववधूसोबत असं काही केलं की... ; रात्रीच भरवली बैठक, पंचायतीत हात जोडून मागितली माफी

लग्नानंतर सासरी जाताच नववधुला आली चक्कर, पतीने करायला लावली प्रेग्नेन्सी टेस्ट; काही क्षणात वातावरण तापलं 

हनिमूनच्या रात्री नवऱ्याने नववधूसोबत असं काही केलं की... ; रात्रीच भरवली बैठक, पंचायतीत हात जोडून मागितली माफी

लग्न हे नातं विश्वासावर अधिक खुलतं. पण जेव्हा नात्यात अगदी सुरुवातीलाच अविश्वास असेल तर... असाच काहीसा प्रकार एका गावात घडला आहे. नववधु लग्न होऊन सासरी जाते तेव्हा ती फक्त एका व्यक्तीवर विश्वास ठेवते. पण जेव्हा तोच व्यक्ती विश्वासाला तडा देतो तेव्हा.... असाच काहीसा प्रकार एका जिल्ह्यात घडला आहे. हनिमूनच्या रात्री नवरीला चक्कर आली तर नवऱ्याने थेट तिला प्रेग्नेंसी टेस्ट किट दिली. जे बघून चक्क नववधु भडकली. एवढंच नाही तर तिने थेट माहेरी फोन करुन हा प्रकार सांगितला. यानंतर नववधुच्या माहेरच्यांनी थेट सासर गाठलं. 

तर झालं असं की, नववधु सासरी पोहोचताच तिला चक्कर आली. यामुळे एकच गोंधळ उडाला. वराने हा सगळा प्रकार आपल्या मित्रांना सांगितला तर त्यांनी त्याला प्रेग्नेन्सी टेस्ट करण्याचा सल्ला दिला. 

चक्कर आली तर... 

मीडिया रिपोर्टनुसार, एका तरुणाचं शनिवारी पारंपरिक पद्धतीने लग्न झाला. वरात घरी पोहोचायला संध्याकाळी झाली. दिवसभराचा क्षीण आणि लग्नाचं प्रेशर यामुळे नववधुला चक्कर आली. हा सगळा प्रकार बघताच वर घाबरला. त्याने हा सगळा प्रकार आपल्या मित्रांना सांगितल, तेव्हा मित्रांनी मस्करीत म्हटलं की, ही तर सगळी गरोदर असण्याची लक्षणे आहेत. या गोंधळात वर रात्रीच गावाबाहेरच्या मेडिकलमध्ये गेला अन् प्रेग्नेन्सी टेस्टचं किट विकत घेऊन आला. 

किट पाहताच... 

हनिमूनच्या दिवशी नवऱ्याने नववधुला किट दिलं आणि टेस्ट करायला सांगितलं. हा सगळा प्रकार बघून हैराण झाली आणि तिने थेट आपल्या वहिनीला फोन केला. आपला नवरा आपल्यावर संशय घेत असल्याचं सांगितलं. एवढंच नव्हे तर या आधी तुझा कुणासोबत संबंध होता का? असं देखील विचारलं. बहिणीने हा सगळा प्रकार खूप गांभीर्याने घेतला आणि कुटुंबाला याची माहिती दिली. काही वेळातच नववधुच्या माहेरच्या मंडळींनी भेट घेतली अन् सासरच्या लोकांना हा सगळा प्रकार सांगितला. 

दोन तास चालली बैठक 

मुलगी लग्न होऊन घरी येताच हा सगळा प्रकार घडल्यामुळे माहेरच्यांनी कुटुंबाला जाच विचारायला सुरुवात केली. हे सगळं प्रकरण इतकं वाढलं की, गावातील लोकांना यामध्ये हस्तक्षेप करायला लागला. पंचायत बोलावण्यात आली. सुरुवातीला खूप गोंधळ झालं. पण नववधु आपल्या मतावर ठाम राहिली की, नवऱ्याने आपल्यावर असा संशय कसा घेतला. या सगळ्यात वराने स्पष्टीकरण देताना सांगितले की, हे वागण्यामागे कोणतीही चुकीची भावना नव्हती तर हे चुकून झालं आहे. 

वराने मागितली माफी... 

दोन्ही पक्षाने पंचायतीसमोर आपली आपली बाजू मांडली. अखेर नवऱ्याने आपल्या चूक मान्य करुन नववधु आणि जवळच्या मंडळींकडे माफी मागितली. पंचायतीत सांगितलं की, यापुढे अशापद्धतीचा कोणताही गैरव्यवहार होणार नाही. तेव्हा त्याने सांगितलं की, त्याला मित्रांनी चुकीचा सल्ला दिला आणि त्यानेही तो विचार न करता मान्य केला. 

Read More