एका आईने आपल्या प्रियकरासोबत मिळून घरात स्वतःच्या 6 वर्षांच्या मुलीला सोनाला जीवे मारलं आहे. ही आई एवढ्यावरच थांबली नाही तर प्रियकरासोबत मुलीच्या मृतदेहासमोर बसून पार्टी केली. 36 तास हे संपूर्ण प्रकरण दाबण्यात आलं आणि हत्येमध्ये नवरा शाहरुखला फसवण्याचा प्रयत्न केला गेला. रोशनीने सोमवारी रात्री तीन वाजता मुलीच्या हत्येची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली.
चौकशी दरम्यान रोशनी गेल्या अनेक महिन्यांपासून नवऱ्याला फसवण्याचा प्लान करत होती. ती नवरा शाहरुख घरी येण्याची वाट पाहत होती. शाहरुख घराबाहेर गेल्यानंतर रोशनीने घरी झोपलेल्या मुलीच्या पोटावर बसली. अचानक हा प्रकार घडला त्यामुळे ती ओरडू लागली. या प्रकारामुळे सोनाच्या नाकातून रक्त येऊ लागले. पण या घटनेनंतरही रोशनी हृदय विरघळलं नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री रोशनीचा फोन आला. ज्यामध्ये पतीने आपल्या मुलीची हत्या केल्याच सांगण्यात आलं. फॉरेंसिक टीमसोबत पोलीस घटनास्थळी पोहोचले. रोशनीने शाहरुखवर आरोप केले की, त्याने मुलीची हत्या केली.
पोलिसांना प्राथमिक तपासात असे कळले की, रोशनी गेल्या दोन वर्षांपासून आपल्या पतीपासून वेगळी राहत आहे. रोशनी प्रियकरासोबत लिव इनमध्ये राहायची. सोमवारी नवरा शाहरुख मुलीला भेटायला आला. या दरम्यान नवरा-बायकोसोबत वाद झाले. वादानंतर शाहरुख निघून गेला त्यानंतर रोशनीने मुलीची हत्या केली. पोलिस चौकशीदरम्यान रोशनीने सांगितले की तिला शाहरुखला तुरुंगात पाठवायचे होते. यासाठी तिने तिच्या प्रियकराशी मिळून त्याला मारण्याचा कट रचला.
कैसरबागच्या खंडारी बाजारात तिच्या घरी मुलगी सोनाची गळा दाबून हत्या करणाऱ्या रोशनीने तिचा मेहुणा सलमान, सासू परवीन आणि दोन मेहुणी रुखसर आणि रूमी यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत आणि सर्वांना तुरुंगात पाठवले आहे. यानंतर रोशनीने मे महिन्यात तिचा पती शाहरुखला मारहाण केली आणि त्याला त्याच्याच घरातून हाकलून लावले.
रोशनीने खंडारी बाजारातील शाहरुखच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅट ताब्यात घेतला आणि उदितसोबत तिथे राहू लागली. यामुळे त्रस्त झालेल्या शाहरुखने १८ मे रोजी रोशनीविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्यानंतर रोशनीला कोणत्याही परिस्थितीत शाहरुखला तुरुंगात पाठवायचे होते. शाहरुख फ्लॅटपासून वेगळ्या भाड्याच्या खोलीत राहतो.