Marathi News> भारत
Advertisement

Shocking: 12 वर्षाच्या मुलाने YouTube Video पाहून बनवली दारु, पिऊन मित्राचे असे झाले हाल

या घटनेची पोलिसात तक्रार झाली असून वाईनचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत

Shocking: 12 वर्षाच्या मुलाने YouTube Video पाहून बनवली दारु, पिऊन मित्राचे असे झाले हाल

Trending News: एका 12 वर्षांच्या मुलाने युट्यूब ट्यूटोरियल (YouTube Tutorials) पाहून घरात वाईन (Homemade Wine) बनवली. ती वाईन त्याने आपल्या मित्राला प्यायला दिली. पण त्यामुळे मित्राची तब्येत खालावली आणि त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं. केरळमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
केरळमध्ये राहणाऱ्या 12 वर्षांच्या एका मुलाने उत्सुकता म्हणून युट्यूब व्हिडिओ पाहून वाईन तयार केली. ती वाईन त्याने आपल्या मित्राला प्यायला दिली. पण ती वाईन पिताच मुलाला उल्टी झाली आणि त्याला अस्वस्थ वाटू लागला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. धक्कादायक म्हणजे ही संपूर्ण घटना एका सरकारी शाळेत झाली. 

शाळा व्यवस्थापनाने पोलिसांना यााबत माहिती दिली. पोलिसांनी मुलाकडे याबाबत चौकशी केली. आई-वडिलांनी घरी आणलेल्या द्राक्षांपासून आपण वाईन बनवल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. ती वाईन त्याने एका बाटलीत भरली आणि यु्टयूब व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्या मुलाने ती बाटली जमीनत पूरली.

पोलीस करणार तपास
पोलिसांनी या वाईनचे नुमने (Sample Of Wine) गोळा करुन रासायनिक तपासणीसाठी (Chemical Examination) पाठवले आहेत. वाईनमध्ये स्पिरिट किंवा इतर अल्कहोल मिसळलं आहे की नाही याचा तपास केला जाणार आहे. वाईनमध्ये स्पिरिट किंवा अल्कहोल (Alcohal) आढळल्यास त्या मुलावर बाल न्याय कायद्यांतर्गत (Juvenile Justice Act) गुन्हा करण्याची विचार केला जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

Read More