Marathi News> भारत
Advertisement

सरकारी कर्मचार्याविषयी धक्कादायक सर्वे

सर्व्हेत धक्कादायक माहिती 

सरकारी कर्मचार्याविषयी धक्कादायक सर्वे

मुंबई : जगातील 86% म्हणजे 10 पैकी 9 कर्मचाऱ्यांचा वेळ हा अनावश्य कामे करण्यात निघून जातो. हे कर्मचारी असे काम करतात ज्याची जबाबदारी त्यांची नाहीच आहे. हा खुलासा क्रोनोजच्या सर्व्हे करण्यात आला आहे. 41 टक्के फूल टाइम असलेले कर्मचारी हे चुकीच्या कामात आपला वेळ घालवतात. तर 40 टक्के कर्मचारी हे अशी काम करतात ज्याचा फायदा त्यांना किंवा त्यांच्या संस्थेला होतच नाही. हा सर्व्हे ऑस्ट्रेलिया, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, मॅक्सिको आणि ब्रिटनमध्ये 2800 कर्मचाऱ्यांवर 31 जुलै ते 9 ऑगस्ट या काळात करण्यात आला आहे. 

जास्त काम करण्याचं भारतीयांवर प्रेशर 

सर्व्हेत अशी बाब समोर आली आहे की, 53 टक्के कर्मचारी हे आपल्या वेळेपेक्षा अधिक काम करण्याला एक प्रकारचं प्रेशर समजतात. भारतात हा आकडा सर्वाधिक असून त्याचं प्रमाण 62 टक्के आहे तर फ्रान्समध्ये 66 टक्के आहे. अशा वेळी त्यांच्याकडून उत्कृष्ठ काम होत नाही. कॅनडात 32 टक्के, अमेरिकेत 44 टक्के आणि ऑस्ट्रेलियात 47 टक्के लोक अधिक काम करण्यामुळे दबाव निर्माण होत असल्याचं सांगतात. 

मीटिंगमध्ये सर्वाधिक वेळ वाया जातो 

सर्व्हेत मोठा खुलासा, सर्वाधिक वेळ म्हणजे 27 टक्के वेळ हा फक्त मिटींग करण्यात जातो. प्रशासकिय कार्यात 27 टक्के मिटिंगमध्ये जातो तर 26 टक्के वेळ सहकाऱ्यांशी बोलण्यात जातो तर ई मेल आदान प्रदान करण्यात 26 टक्के निघून जातात. तर महत्वाची बाब म्हणजे 22 टक्के लोकं ही चर्चा करण्यात खालवतात की त्यांच्यामुळे हे काम खराब झालेलं नाही. 

Read More