Marathi News> भारत
Advertisement

धक्कादायक ! ही वेब सीरीज पासून आफताबने आखली श्रद्धाच्या हत्येची योजना

Shraddha Murder Case : आफताबने श्रद्धाच्या हत्येची कबुली दिली आहे. त्याने हत्येची योजना कशी आखली याबाबत ही खुलासा केलाय.

धक्कादायक ! ही वेब सीरीज पासून आफताबने आखली श्रद्धाच्या हत्येची योजना

Shraddha Murder Case : दिल्लीतील श्रद्धा ( Shraddha ) हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवलं. 6 महिन्यानंतर या हत्याकांडाचं सत्य समोर आलंय. मुलीच्या वडिलांनी पोलिसात केलेल्या तक्रारीनंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. नाहीतर श्रद्धा ही या जगात नाही हे आरोपी शिवाय कोणालाच कळालं नसतं. आफताब पूनावाला ( Aftab Poonawalla ) यांचं वय 28 वर्ष आहे. तो 26 वर्षीय श्रद्धा सोबत लिव्ह-इन मध्ये राहत होतो. कुटुंबाचा या नात्याला विरोध असल्याने दोघेही मुंबईहून दिल्लीला निघून गेले होते. पण श्रद्धाला काय माहित होतं ज्याच्यावर विश्वात ठेवून ती जात आहे तोच तिचा इतका मोठा विश्वासघात करेल.

जिच्यावर प्रेम केलं तिच्याच मृतदेहाचे 35 तुकडे करताना त्याला काहीच वाटलं नसेल का? मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर त्याने ते फ्रीजमध्ये ठेवले होते. तो दररोज रात्री मेहरौलीच्या जंगलात जावून त्याची विल्हेवाट लावत असे. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्यानंतर त्याने मीच श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली.

मुंबईत एका कॉल सेंटरमध्ये काम करत दोघांची ओळख झाली. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण श्रद्धा यामध्ये फसली. मे महिन्यात दोघांनी दिल्लीत एक घर भाड्याने घेतलं. 18 मे रोजी आरोपीने श्रद्धाची हत्या केल्याचं सांगितलं. कारण ती त्याच्याकडे लग्नाची मागणी करत होती.

वेब सीरीज पाहून हत्येची योजना

आरोपी आफताबने डेक्सटर वेब सिरीज पाहिल्यानंतर ही हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची कल्पना त्याला याच वेब सीरिजमधून आली. मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून तो घरात अगरबत्ती लावत होता.

कसं समोर आलं प्रकरण

मुलीच्या वडिलांना अनेक दिवसांपासून मुलीबाबत काहीच माहिती मिळत नव्हती. तिचा फोन बंद होता. त्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठलं. दिल्लीत जावून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी याचा शोध सुरु केला. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने हत्या केल्याचं कबुल केलं. आरोपी आफताबला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Read More