Marathi News> भारत
Advertisement

खोल समुद्रात सापडला प्रभू श्रीरामांचा धनुष्य? व्हायरल झालेल्या व्हिडिओचे सत्य काय?

Fake Viral Video Fact Check: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत धनुष्य दिसत असून तो प्रभू श्रीरामांचा असल्याचे बोलले जात आहे.   

खोल समुद्रात सापडला प्रभू श्रीरामांचा धनुष्य? व्हायरल झालेल्या व्हिडिओचे सत्य काय?

Fake Viral Video Fact Check: सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. निळ्याशार समुद्रातून एक सोन्याचा धनुष्य बाहेर येताना दिसतोय. यामुळं इंटरनेटवरही एकच धुमाकुळ सुरूये. हा व्हिडिओ इतका खरा वाटतो अनेकांनी कमेंटमध्ये जय श्री राम अशा कमेंट केल्या आहेत. तसंच, हात जोडून नमस्कारदेखील करत आहेत. हा काही साधारण धनुष्य नसून भगवान श्री राम यांचा दिव्य धनुष्य आहे, असा दावा करण्यात येत आहे. कित्येक वर्षांनंतर समुद्राच्या पोटातून हा समुद्र बाहेर काढण्यात आला आहे, असंदेखील या व्हिडिओत म्हटलं जात आहे. पण या दाव्यामागे काय सत्य मात्र भलतंच आहे. काय आहे नेमकं सत्य जाणून घ्या. 

व्हिडिओत शांत व निळा समुद्र दिसत आहे. तर खोल समुद्रातून सोन्यासारखा एक धनुष्य बाहेर काढण्यात येत आहे. सूर्याची मावळती किरणे या धनुष्यावर पडताच ते आणखी चमकताना दिसत आहे. मात्र या व्हिडिओची पडताळणी केल्यानंतर मात्र वेगळेच सत्य समोर आले आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाल्यानंतर फॅक्ट चेकर्स टीम अॅक्टिव्ह झाली आणि या व्हिडिओत केलेला दावा खोटा असल्याचे समोर आले. तसंच, हा व्हिडिओदेखील खोटा असल्याचे समोर आले आहे. 

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ AI Generated असून व्हिडिओत दिसलेला समुद्रदेखील खोटा आहे. तसंच, तो धनुष्य, जहाज आणि त्यावरील माणसं हीदेखील खोटी आहेत. अॅडव्हान्स टेक्नोलॉजी जसं की Midjourney, Runway किंवा DALL·E सारखे टुल्सच्या मदतीने असे व्हिडिओ बनवले जाऊ शकतात. असे व्हिडिओ हे अगदी खरेखुरे वाटतात आणि लोकांना पटकन विश्वास ठेवणे भाग पडतात. व्हिडिओची अगदी योग्य पद्धतीने पडताळणी केल्यास व्हिजुअलमध्ये अनेक त्रुटी आहेत. जसं की लाटांची दिशा विशिष्ट पद्धतीने वाहणे. प्रकाश आणि धनुष्याची चमक सतत बदलणे. हे सगळं संकेत स्पष्टपणे इशारा करतात की हा व्हिडिओ खोटा आहे. आता युजर्सही या व्हिडिओवर वेगवेगळ्या रिअॅक्शन देत आहेत. फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडिओ खोटा असल्याचे आढळले आहे. 

Read More