Karnataka Budget 2025: कर्नाटक सरकारने आर्थिक वर्ष 2025-26 साठी 4,08,647 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. विकास, पायाभूत सुविधा, महिला सशक्तीकरण आणि अन्य क्षेत्रांसाठीदेखील घोषणा. या अर्थसंकल्पात त्यांनी अल्पसंख्यांकांसाठी आणि मुस्लिम समुदायासाठीही अनेक मोठ्या योजनांची घोषणा केली आहे.
कर्नाटक सरकारने अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अल्पसंख्याक कॉलनी विकास कार्यकर्मांतर्गंत 1 हजार कोटी रुपयांची कार्ययोजना तयार करण्यात आली आहे. 2025-26 ही योजना लागू करण्यात येणार आहे. वक्फ संपत्तींचे पुर्नविकास आणि मुस्लिम कब्रस्तानच्या सुरक्षेसाठी 150 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल असणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील विवाहांसाठी एनजीओच्या माध्यमातून 50,000 रुपयांची मदत जाहीर केली जाणार आहे. मात्र यासाठी लग्न साध्या पद्धतीने पार पाडणे आवश्यक आहे. जर लग्न अलिशान पद्धतीने झाले तर ही मदत मिळणार नाहीये.
अर्थसंकल्पात जैन पुजारी, शिख ग्रंथी आणि मशिदीतील इमामांचे मानधन वाढवून 6 हजार रुपये महिना केले आहे. सहाय्यक ग्रंथी आणि मुअज्जिंनांचे मानधन 5000 रुपये प्रति महिना करण्यात येणार आहे. 2 बी श्रेणीच्या अल्पसंख्यांक ठेकेदारांना अन्य समुदायांबरोबरच 2 कोटी रुपयांपर्यंत सरकारी काम मिळणार आहे.
या अर्थसंकल्पात बेंगळुरूतील हज भवनाचा विस्तार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. येथे हज यात्रेकरु आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधुनिक सुविधा पुरवल्या जातील. कर्नाटकात 250 मौलाना आझाद मॉडेल इंग्लिश स्कुल सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या शाळा सरकारी धोरणांतर्गंत सुरू केल्या जातील.
- बेंगळुरू शहरात रस्ते निर्माणासाठी 19,000 कोटी रुपयांची तरतूद
- 8,916 कोटी रुपयांचा निधीने डबल डेकर फ्लायओव्हर बनवण्यात येणार
- ब्रँड बँगलोर प्रकल्पाअंतर्गंत 1,800 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. यात 40.5 किमी लांबीचा डबल डेकर फ्लायओव्हर बांधला जाणार आहे.
- 660 कोटी रुपये खर्चून बेंगळुरू सेफ सिटी प्रकल्प लागू करण्यात येणार आहे. ज्यात 7,500 कॅमरे, ड्रोन आणि 60 बॉडी वॉर्न कॅमेरे लावण्यात येतील.