Marathi News> भारत
Advertisement

अर्ध्या भारतीयांना माहित नाहीये SIPचा हा 22/12/22 फॉर्म्युला, रिटायरमेंटला मिळतील कोट्यवधी

SIP 22/12/22 Formula: आजच्या काळात प्रत्येकालाच झटपट श्रीमंत होण्याचे वेध लागले आहेत. 22/12/22 असा हा फॉर्म्युला आहे. 

अर्ध्या भारतीयांना माहित नाहीये SIPचा हा  22/12/22 फॉर्म्युला, रिटायरमेंटला मिळतील कोट्यवधी

SIP calculation: आजच्या बदलत्या काळात खर्च वाढले आहेत. प्रत्येकालाच करोडपती व्हावं असं वाटतं. मात्र तुमच्या नोकरीतून मिळणाऱ्या पगारातून तुमचं हे स्वप्न पूर्ण होणं थोडं अवघड आहे. अशातच म्युच्युअल फंड SIP तुमच्यासाठी एक स्मार्ट पर्याय आहे. त्याच्या मदतीने तुम्हाला कोट्यवधी रुपयांचा फंड तयार करता येणार आहे. आज आम्ही तुम्हाला SIP चा सिक्रेट फॉर्म्यूला सांगणार आहोत. प्रत्येक महिन्याला 22,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास जवळपास 22 वर्षात 12 टक्क्यांचा परताव्यानुसार तुम्हाला अडीच कोटी रुपयांपर्यंतचा फंड जमा करू शकतो. 

तुम्ही 30 वर्षाच्या वयात निवृत्ती घ्यायची असेल आणि फायनेंशियल फ्रीडम पाहिजे असेल तर SIPचा  '22x12x22' फॉर्म्युला तुमच्यासाठी मनी मेकिंग ठरू शकते. या फॉर्म्युलानुसार प्रत्येक महिन्याला 22,000ची SIP केल्यास 22 वर्षांपर्यंत गुंतवणूक करा. त्यानंतर दरवर्षी 12 टक्के परतावा मिळू शकेल. म्हणजे वयाच्या 52व्या वर्षापर्यंत तुम्ही 2 कोटींपर्यंतचा फंड तयार करू शकता. हा प्लान रिटायरमेंटच्या आधी करोडपती बनण्याचा सोप्पा आणि विश्वासू पर्याय आहे. 

एसआयपीचा '22x12x22' फॉर्म्युला

जर तुम्हाला भविष्यात पैशांचे टेन्शन नको असेल तर SIPचा  '22x12x22' फॉर्म्युला सगळ्यात बेस्ट ठरू शकतो. या प्लानअंतर्गंत प्रत्येक महिन्याला 22,000 गुंतवणूक करा आणि 22 वर्षांपर्यंत हफ्ते भरल्यानंतर रिटारमेंटनंतर तुमचे टेन्शनच संपून जाईल. या योजनेची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे पावर ऑफ कंपाउंडिंग. हा फॉर्म्युला तुमची छोटी गुंतवणूक मोठ्या रकमेत बदलू शकतो. 

जर तुम्ही SIP मध्ये दरमहा ₹22,000 गुंतवले आणि ते 22 वर्षे न थांबता SIP चालू ठेवले तर तुम्हाला त्यावर 12% वार्षिक चक्रवाढ परतावा मिळू शकतो. या चक्रवाढ परताव्याच्या क्षमतेसह, तुमचा एकूण संपत्तीचा नफा सुमारे ₹2,017,2549 (2 कोटी) कोटींपर्यंत पोहोचू शकतो. याचा अर्थ तुमची छोटीशी मासिक बचत तुम्हाला करोडपती बनवू शकते.

उदाहरणार्थ, आपण असे गृहीत धरू की जर तुम्ही दरमहा ₹22,000 ची SIP केली आणि ती 22 वर्षे सुरू ठेवली तर तुमची गुंतवणूक सुमारे ₹58,08,000 (58.1 लाख) असेल. आता जर तुम्हाला या गुंतवणुकीवर 12% वार्षिक चक्रवाढ परतावा मिळाला, तर त्यावर तुमचा संपत्तीचा नफा ₹2,01,72549 (२ कोटी) कोटी असू शकतो. म्हणजेच, एकूण तुमचा निधी ₹2,5,980549 (2.6 कोटी) कोटींपर्यंत वाढू शकतो. एसआयपीचा हा २२x१२x२२ फॉर्म्युला करोडपती होण्याचा एक सोपा आणि विश्वासार्ह मार्ग बनू शकतो.

आम्ही तुम्हाला सांगतो की SIP चा खरा फायदा मॅच्युरिटी फंडमध्ये दिसून येतो. विशेष म्हणजे जास्त परताव्यासाठी, इक्विटी म्हणजेच शेअर बाजाराशी संबंधित म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे चांगले मानले जाते. हे केवळ दीर्घकालीन परतावा वाढवत नाही तर करोडपती होण्याचा मार्ग देखील सोपा करते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)

Read More