Marathi News> भारत
Advertisement

अण्णा हजारेंची तब्येत खालावली, रुग्णालयात जायला नकार

लोकपाल, लोकायुक्त आणि शेतमालाला हमीभावाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारेंची तब्येत खालावली आहे.

अण्णा हजारेंची तब्येत खालावली, रुग्णालयात जायला नकार

नवी दिल्ली : लोकपाल, लोकायुक्त आणि शेतमालाला हमीभावाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारेंची तब्येत खालावली आहे. अण्णांचं ब्लड प्रेशर वाढल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची सूचना दिली आहे. पण हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायला अण्णांनी नकार दिला आहे. अण्णा हजारेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. दिल्लीतल्या रामलिला मैदानामध्ये अण्णा हजारे उपोषणाला बसले आहेत. 

अण्णांच्या सदस्याला पोलिसांची मारहाण 

शांततेमध्ये कँडल मार्च काढणाऱ्या अण्णांच्या कोअर टीममधल्या सदस्याला पोलिसांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी अण्णांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. दिल्ली पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. 

Read More