Marathi News> भारत
Advertisement

Small Business Idea | घर बसल्या फक्त 10 हजारात सुरू करा बिझनेस; छप्परफाड कमाईची संधी

 जर तुम्ही आपल्या जॉबला कंटाळला असाल तर, आम्ही तुमच्यासाठी शानदार बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. 

Small Business Idea | घर बसल्या फक्त 10 हजारात सुरू करा बिझनेस; छप्परफाड कमाईची संधी


मुंबई : जर तुम्ही आपल्या जॉबला कंटाळला असाल तर, आम्ही तुमच्यासाठी शानदार बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत. या व्यवसायातून लाखो रुपये कमाई तुम्ही करू शकता. या बिझनेसला सुरू करण्यासाठी फक्त 10 हजार रुपयांची गुंतवणूक आवश्यक आहे. हा बिझनेस आहे आइस्क्रिम पार्लर चा...

मार्केटमध्ये जबरदस्त डिमांड 
सध्याच्या दिवसांमध्ये आइस्क्रिमची क्रेज खूप वाढली आहे. अनेक लग्न, जन्मदिवस किंवा अन्य कार्यक्रमात आइस्क्रिमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याशिवाय आजकाल लोकांना सर्व सिजनमध्ये आइस्क्रिम खान्याची सवय झाली आहे. त्यामुळे आइस्क्रिमचा बिझनेस नक्कीच चांगला नफा देणारा ठरू शकतो. 

बनवावा लागेल FSSAI लायसंन्स
आइस्क्रिमचा बिझनेसमध्ये मागील काही वर्षांपासून वाढ होत आहे. ट्रेड बॉडी FICCI च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 2022 पर्यंत देशातील आइस्क्रिमचा व्यवसाय एक अब्ज डॉलरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. जर तुम्ही बिझनेस सुरू करू इच्छित असाल तर, FICCI चे लायसंन्स तयार करणे गरजेचे असेल. यासाठी 15 अंकी क्रमांक प्राप्त होतो. म्हणजेच तुमच्या येथे तयार केला जाणारे प्रोडक्ट FICCI च्या गुणवत्तेचे प्रमाणाची पूर्तता करते.

अशा सुरू करा बिझनेस
हा बिझनेस तुम्ही घरीच सुरू करू शकता. जर तुमच्या घराचे लोकेशन ग्राहकांना आकर्षित करणारे नसेल तर, मार्केटमध्ये दुकान भाडेतत्वावर घेऊन बिझनेस सुरू करू शकता. 

अमूलची फ्रेंचाइजी घेऊ शकता
अमूल आइस्क्रिम पार्लरसाठी कमीत कमी 300 स्क्वे फूट जागेची गरज असते. जर तुमच्याकडे जागेची व्यवस्था असेल तर फ्रेंचाइजी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला  retail@amul.coop येथे मेल करणे आवश्यक आहे. याशिवाय http://amul.com/m/amul scooping parlours या लिंकवर जाऊन माहिती घेऊ शकता.

 

 

Read More