Marathi News> भारत
Advertisement

PHOTO : केंद्रीय मंत्री स्मृती इरानी आयुष्याच्या क्रेझी राईडवर...

ही बाईक पाहून तुम्हाला 'टायगर जिंदा है'चा सलमान खानही आठवू शकतो... 

PHOTO : केंद्रीय मंत्री स्मृती इरानी आयुष्याच्या क्रेझी राईडवर...

मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इरानी सध्या सोशल मीडियावर वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहेत. मंत्रालय आणि राजकीय कामांमध्ये व्यस्त असलेल्या मंत्री महोदया सध्या एक अॅडव्हेन्चरस राईडवर निघाल्यात. स्मृती इरानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. यामध्ये त्या एका अॅडव्हेन्चर बाईकवर स्वार झालेल्या दिसत आहेत. ही बाईक पाहून तुम्हाला 'टायगर जिंदा है'चा सलमान खानही आठवू शकतो... 

राजकीय कार्यक्रम असो किंवा दररोजचं आयुष्य... राजकारणात आल्यानंतर स्मृती इरानी दररोज ट्रेडिशनल लूकमध्येच दिसल्यात. परंतु, आता मात्र त्यांचा लूक वेगळाच आहे. यावेळी त्यांनी काळ्या रंगाचं शर्ट आणि सफेद पॅन्टमध्ये दिसत आहेत. 

'कारण आयुष्य हीच एक क्रेझी राईड आहे' असं कॅप्शन स्मृती इरानी यांनी आपल्या या फोटोला दिलीय. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होतेय. 

काही दिवसांपूर्वीही स्मृती इरानी यांनी आपले पती जुबिन इरानी आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खान यांचा एक फोटो शेअर केला होता. यात त्यांनी म्हटलं होतं 'ओन्ली वुमन गॉसिप'... त्यांची ही पोस्टदेखील चांगलीच व्हायरल झाली होती. 

स्मृतीनं २००१ साली जुबिन इरानीसोबत विवाह केला होता. या जोडप्याला जौहर हा मुलगा आणि जोइश नावाची एक मुलगी आहे. 'शेनियल' ही त्यांची सावत्र मुलगी आहे. शेनियल स्मृती यांचे पती जुबिन इरानी आणि त्यांची माजी पत्नी मोना इरानी यांची मुलगी आहे. 

Read More