Marathi News> भारत
Advertisement

Video : लग्नपत्रिका पाहून विमानतळ अधिकाऱ्यांना बसला धक्का, मुलीनं केलेला प्रकार पाहून चक्रावून जाल

या लग्नपत्रिकेचा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल

Video : लग्नपत्रिका पाहून विमानतळ अधिकाऱ्यांना बसला धक्का, मुलीनं केलेला प्रकार पाहून चक्रावून जाल

कोणत्याही लग्नात (Marriage) लग्नपत्रिका खूप महत्त्वाची असते आणि लोक त्याची आतुरतेने वाट पाहत असतात. पत्रिका मिळताच लोक आनंदाने लग्नाला जातात, पण ती मिळाली नाही तर खास मित्र आणि नातेवाईकही यायला नकार देतात. लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी छापलेली लग्नपत्रिका (Wedding Card) ही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका लग्नपत्रिकेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आलाय जो पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

लग्नपत्रिका घेऊन एक मुलगी विमानतळावर (Airport) पोहोचली, पण तिच्याकडे कोणी लक्ष देणार नाही, असे तिला वाटले. मात्र तपासानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. या लग्नपत्रिकेने अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला.

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर (twitter) शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. "लग्नाची पत्रिका घेऊन आलेल्या मुलीला विमानतळावर ताब्यात घेतलं आहे. या पत्रिकेमध्ये ड्रग्ज होते. विमानतळावर कोणाकडूनही काहीही घेऊ नका. मग तो म्हातारा असो वा तरुण, पुरुष असो वा स्त्री. त्याचा आकार, वस्तू काहीही असो," असे व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. विमानतळावरील अधिकाऱ्यांनी लग्नपत्रिकेच्या आतून ड्रग्ज (Drugs) जप्त केले. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर धक्का बसला आहे.

लग्नपत्रिकेच्या आतून ड्रग्जची तस्करी (Drugs Smuggling) करता येईल असं कुणालाही वाटले नसेल. मात्र, उच्च तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तरुणीला पकडण्यात आले असून, आता पोलीस तिची चौकशी करत आहेत. आयपीएस अधिकाऱ्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये विमानतळाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

दरम्यान, ड्रग्ज तस्करीच्या या अनोख्या पद्धतीने सर्वांनाच चक्रावून सोडलं आहे.

Read More