Marathi News> भारत
Advertisement

रस्त्यावर फूलं विकणाऱ्या 'या' मुलीचा सोशल मीडियावर जलवा, खरे फोटो पाहून व्हाल थक्क

रस्त्यावर फुलं विकणाऱ्या या सुंदर मुलीला पाहून सोशल मीडियावर लाईक्सचा पाऊस

रस्त्यावर फूलं विकणाऱ्या 'या' मुलीचा सोशल मीडियावर जलवा, खरे फोटो पाहून व्हाल थक्क

Viral Photos: सोशल मीडिया (Social Media) हे सध्याचं प्रभावी माध्यम आहे. दररोज काही ना काही फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ किंवा फोटो पाहून विसरून जातो, तर काही कायमचं लक्षात रहातं. सोशल मीडियावर सध्या अशाच एका मुलीच्या फोटोने धुमाकून घातला आहे. ही मुलगी रस्त्यावर फूल विकताना दिसत आहे. यादरम्यान एकाने या मुलीचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहे. 

रस्त्यावर फुलं विकणाऱ्या या सुंदर मुलीला पाहून लोकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. काही युझर्सने म्हटलंय, सावळ्या रंगात ही मुलगी खूपच रेखीव दिसत आहे. आता मुलीचे खरे फोटो समोर आले आहे. जे पाहून लोकांना आधीच्या फोटोंवर विश्वासच बसत नाहीए. 

fallbacks

खरे फोटो पाहून नेटकरी थक्क
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही सुंदर मुलगी नेमकी आहे तरी कोण? या मुलीचं नाव आहे अंशा मोहन (Ansha Mohan). इंस्टाग्रामवर (Instagram) या नावाने तीचं अकाऊंट आहे. अंशा मोहन ही social media influencer आहे. रस्त्यावर फूलं विकण्याचं फोटोशूट (Photo Shoot) अंशाने ऑगस्टमध्ये केलं होतं. पण आता तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 

fallbacks

अंशाने फोटोशूटसाठी हा लूक केला होता. फूल विकण्यासाठी केलेल्या गेटअपमध्ये सावळ्या रंगात ती खूपच सूंदर दिसत आहे.  तरी प्रत्यक्षात तिचा वर्ण गोरा असून तिचे अनेक फोटो सोशल मीडिआवर व्हायरल होत असतात. अंशा मोहन सोशल मीडिआवर चांगलीच प्रसिद्ध आहे. इन्स्टाग्रामवर तिचे तब्बल तीन लाख फॉलोअर्स आहे. तिच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो व्ह्यूज असतात. तर फोटोंनाही हजारोंनी लाईक्स असतात.

रस्त्यावर फूल विकणाऱ्या या व्हिडिओला 37.9 मिलिअनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर इन्स्टाग्रामवर तिच्या फोटोलाही हजारोंनी लाईक्सही मिळाले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ANSHA MOHAN (@ansha_mohan)

 

Read More