Marathi News> भारत
Advertisement

Google सर्च करताच समोर आलं आईचं सत्य, ऐकून मुलाला बसला मोठा धक्का

या मुलांने जेव्हा आपल्या आईचं नाव गुगलवर सर्च केलं, तेव्हा त्याच्या पाया खालची जमीनच सरकली.

Google सर्च करताच समोर आलं आईचं सत्य, ऐकून मुलाला बसला मोठा धक्का

मुंबई : आई ही आई असते, तिच्यासारखी माया कोणीही करु शकत नाही. आईला कितीही त्रास झाला तरी ती, बाळावर जीवापाड प्रेम करत असते. मुलं मोठी झाली असली, तरी ती आपल्या आईसाठी लहानच असतात. म्हणून तर आपल्या मुलाला काहीही झालं तरी आईच्या डोळ्यात चटकण पाणी येतं. म्हणून तर ते म्हणतात ना 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी'. परंतु एका मुलासोबत एक विचित्र घटना घडली.

या मुलांने जेव्हा आपल्या आईचं नाव गुगलवर सर्च केलं, तेव्हा त्याच्या पाया खालची जमीनच सरकली. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, असं का? आणि या मुलाने आपल्या आईबद्दल नक्की असं काय पाहिलं असेल, ज्यामुळे त्याला असा धक्का बसला असावा?

खरं तर यूकेमध्ये राहणारा 30 वर्षीय रीके मॅडिकसोबत (Reece Maddick) ही घटना काही वर्षांपूर्वी घडली होती.

रीके मॅडिक आणि त्याचा भाऊ ऍलन दोघे ही लहान असताना कॅरोल मॅडिक यांनी दत्तक घेतले होते. परंतु रीके आणि ऍलन यांना त्यांची खरी आई, लिंडा मॅकआरिटी ही आपली आई आहे हे माहित होतं. त्या दोन्ही मुलांना त्यांच्या आईला अधूनमधून भेट देण्याची परवानगी होती.

रीकेची आई दोन्ही मुलांना भेटायला प्रत्येक वर्षी क्रिसमसमध्ये यायची किंवा फोन करायची, परंतु गेली 3 वर्ष तिने आपल्या मुलांना कॉन्टॅक्ट केला नाही किंवा त्यांना भेटायला देखील आली नाही. ज्यामुळे रीके विचारात पडला.

रीके लिंडाबद्दल काहीच माहिती नव्हते, परंतु त्याला आता काहीही करुन आपल्या आईला भेटायचे होते. ज्यासाठी त्याने आपल्या आईला कसं शोधावं, यावर विचार करायला सुरुवार केली.

fallbacks

एकेरात्री रीके रात्री 2 वाजता लिंडाचा विचार करत Google चालवत होता. तेव्हा अचानक त्याने लिंडाला गुगलवर सर्च करण्याचा विचार केला. त्याला हे माहित होतं की, आपल्याला काहीतरी नक्कीच सापडेल. ज्यामुळे त्याने आपल्या आईला गुलवर सर्च केलं, तेव्हा त्याच्यासमोर धक्कादायक माहिती समोर आली.

2018 मध्येच त्याची आई लिंडा मरण पावल्याचे रीकेला समजले. त्याच्या आईचा कोणीतरी खून केला होता असे त्याच्या लक्षात आले. एका लेखात लिंडाबद्दल लिहिलेल्या गोष्टी वाचून रीके थक्क झाला. त्याला समजले की, त्याची आई ड्रग्स घेत होती आणि ड्रग्जच्या भांडणात दुसऱ्या एका व्यक्तीने त्याच्या आईचा खून केला. 

त्यावेळी त्याच्या लक्षात आले की, म्हणूनच आपली आई गेली 3 वर्ष आपल्या मुलांना भेटायला येऊ शकलेली नाही.

Read More