Marathi News> भारत
Advertisement

घराच्या कागदपत्रांवर सोनाली फोगट यांचा पीएची पत्नी म्हणून उल्लेख; धक्कादायक माहिती समोर

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाला आता आणखीन एक वेगळं वळण लागलं आहे

घराच्या कागदपत्रांवर सोनाली फोगट यांचा पीएची पत्नी म्हणून उल्लेख; धक्कादायक माहिती समोर

भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट (Sonali Phogat) यांच्या मृत्यूनंतर रोज नवी माहिती समोर येत आहे. सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) सोनाली फोगट यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र ड्रग्जचा (Drugs) ओव्हर डोस झाल्याने सोनाली फोगट यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.

गोव्यातील (Goa) एका हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार घडला आणि त्यानंतर फोगट यांचा मृत्यू झाला. हॉटेलमधील या घटनेचा एक व्हिडीओही समोर आला होता. सोनाली फोगट यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यासोबत अत्याचार झाल्याचाही आरोप केला होता. त्यानंतर पोलिसांनी फोगाट यांच्या पीएसह त्याच्या मित्रालाही अटक केली आहे.

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाला आता आणखीन एक वेगळं वळण लागलं आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, सेक्टर 102 मधील गुडगाव ग्रीन्समधील एका भाड्याच्या घराच्या कागदपत्रांमध्ये सोनाली फोगट यांचे नाव त्यांचे पीए सुधीर सांगवान यांच्या पत्नी म्हणून होते.

सोनाली फोगट या बर्‍याचदा त्या घरामध्ये राहत होत्या. गोव्याला जाण्यापूर्वी फोगट त्यांच्या पीएसह त्या फ्लॅटवर गेल्या होत्या आणि त्यानंतर विमानतळावर जाण्यासाठी कॅब घेतली होती, असे सूत्रांनी सांगितले.

गुडगाव ग्रीन्समध्ये भाड्याने घेतलेले घर कृष्णकांत तिवारी यांच्या मालकीचा होते. घर भाड्याने देताना पोलीस पडताळणीही करण्यात आली.

पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी यांना सोनाली फोगट यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली असली तरी हेतू अद्याप समजू शकलेला नाही.

Read More