Marathi News> भारत
Advertisement

'माझ्या बहिणीला फासावर लटकवणार, तिला..,' राजा रघुवंशीच्या आईला भेटला सोनमचा भाऊ; म्हणाला 'ती राखी बांधून...'

Indore Sonam Raghuvanshi Case: राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात एक वेगळं वळण आलं आहे. सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंद रघुवंशी हा राजा रघुवंशीच्या इंदोरमधील घरी पश्चाताप व्यक्त करण्यासाठी पोहोचला होता.   

'माझ्या बहिणीला फासावर लटकवणार, तिला..,' राजा रघुवंशीच्या आईला भेटला सोनमचा भाऊ; म्हणाला 'ती राखी बांधून...'

Indore Sonam Raghuvanshi Case: राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरणात एक वेगळं वळण आलं आहे. सोनम रघुवंशीचा भाऊ गोविंद रघुवंशी हा राजा रघुवंशीच्या इंदोरमधील घरी पोहोचल्याने हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. तो पश्चाताप व्यक्त करण्यासाठी पोहोचला होता. गोविंद रघुवंशीने यावेळी राजाच्या आईची भेट घेतली. दोघेही यादरम्यान धायमोकलून रडत होते. गोविंदने यादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ज्यांनी हत्या केली, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं म्हटलं. गोविंदने दावा केला आहे की, त्याला सोनमच्या कटाबाबत काही माहिती नव्हती आणि तिने आपले गुन्हेही कबूल केलेले नाहीत.

गोविंदने सांगितलं आहे की, तो गाजीपूरमध्ये फक्त दोन मिनिटांसाठी सोनमला भेटला, पण तिने कोणताही गुन्हा कबूल केला नाही. पुढे त्याने म्हटलं की, राज कुशवाह आमच्या येथे कर्मचारी होती. सोनमचे त्याच्यासोबत प्रेमसंबंध नव्हते. ती त्याला राखी बांधायची. 

गोविंदने असाही दावा केला आहे की, सोनमने आपल्या आईला राज कुशवाहसंदर्भात काही सांगितलं नव्हतं. तो म्हणाला, "पंडितने लवकर मुहूर्त काढल्याने सोनमचं लवकर लग्न झालं". हल्लेखोरांना फाशीची शिक्षा व्हायला हवी असंही त्याने म्हटलं. 

सोनमने आईला दिली होती धमकी

सोनम रघुवंशी राज कुशवाहाच्या प्रेमात होती, आणि तिने कुटुंबाला जर जबरदस्ती राजा रघुवंशीसोबत लग्न लावलं तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिली होती अशी पोलीस सूत्रांची माहिती आहे. राजाचा मोठा भाऊ विपिनने आपल्या जबाबात सांगितलं आहे की, सोनमने तिच्या आईला राजसोबतच्या तिच्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितलं होतं. परंतु तिच्या आईने या नात्याला विरोध केला.

"विपिन आणि सोनम यांनी आधीच त्यांच्या आईला राजसोबतच्या नात्याची माहिती दिली होती. मला राजासोबत लग्न करायचं नाही असं तिचं म्हणणं होतं. पण तिच्या आईने राजसोबतच्या नात्याला विरोध केला आणि आपल्याच समाजात लग्न करण्याचा निर्णय घेतला," अशी सूत्रांची माहिती आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, "विपीनने दावा केला आहे की, सोनमने तडजोड करत लग्न करण्याची तयारी दर्शवली होती. तसंच याचे परिणाम भोगण्यास तयार राहा असा इशारा दिला होता. कोणीही ती राजाची हत्या करेल असा विचार केला नव्हता".

Read More