Sonam Raghuwanshi Astrologer Prediction Trun True: मेघालयमध्ये हिनमूनला गेलेल्या रघुवंशी कुटुंबातील जोडप्यासंदर्भात नवीन खुलासे समोर येत आहेत. 2 जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह एका धबधब्याजवळ सापडल्यानंतर बेपत्ता असलेली राजाची पत्नी सोनम रघुवंशी तब्बल सात दिवसानंतर उत्तर प्रदेशमधील एका ढाब्यावर सापडली. सोनमला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तिने तिच्या प्रियकर आणि तीन हल्लेखोरांच्या मदतीने नवऱ्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकरणात आता नवीन खुलासे समोर येत असतानाच सोनमच्या लग्नाच्या आधी तिच्या कुटुंबाने केलेल्या काही धार्मिक विधींदरम्यान पंडितांनी दिलेला सोनमसंदर्भातील इशारा खरा ठरला आहे. सोनम आणि राजाची कुंडली जुळवणाऱ्या ज्योतिषाने केलेली दोन भाकितं खरी ठरली आहे.
ज्योतिषी एन. के. पांडे नावाच्या पंडिताने सोनम आणि राजा या दोघांच्या जन्मपत्रिका जुळवल्या होत्या. दोघांच्याही जन्मपत्रिकेमध्ये मांगलिक दोष होता. वर आणि वधू दोघेही मांगलिक असतील तर दोष मानला जात नाही. आधी या दोघांच्या लग्नाची तारीख 16 मे अशी निश्चित करण्यात आली. मात्र काही कारणाने लग्न 11 मे रोजी करण्याचं ठरलं. लग्नाची नवी तारीख निश्चित झाल्यानंतर ज्योतिषी पांडे यांनी सोनमच्या घरच्यांना 12 मे रोजी इशारा दिलेला. हनिमूनला जाण्यासाठी थोडा वाट पाहाव असं ज्योतिषाने सांगितलं होतं. तसेच सोनम परत यावी असं वाटत असेल तर काय करावं याबद्दलही ज्योतिषाने दिलेल्या सल्ल्यामुळेच सोनम जिवंत परत अल्याचा तिच्या वडिलांचा दावा आहे.
30 मे पूर्वी सोनमला माहेरुन सासरी पाठवू नका असं ज्योतिषाने सांगितलं होतं. 31 मे रोजी दुपारी 12 नंतर किंवा सायंकाळी सोनमला सासरी पाठवा असं ज्योतिषाने सांगितलेलं. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन पुढील तीन दिवसांमध्ये म्हणजेच 14 मे रोजी सोनमला पहिल्यांदा सासरी पाठवण्यात आलं.
नक्की वाचा >> रात्री एकला सोनम एकटीच चालत आली, ढाब्यातून घरच्यांना फोन अन् पोलीस पोहचले तेव्हा..; रात्री घडलं काय?
मेघालयमध्ये हिनमूनसाठी गेलेले सोनम आणि राजा दोघे 22 मे रोजी बेपत्ता झाल्यानंतर सोनमच्या वडिलांना ज्योतिषाने सांगितलेली ही गोष्ट आठवली. त्यामुळेच हे दोघे बेपत्ता असताना सोनमचे वडील ज्योतिषींकडे गेले. त्यांनी सोनमचा फोटो उलटा करुन दारावर लटकवण्याचा सल्ला दिला. असं केलं तर सोनम परतण्याची शक्यता वाढेल असं ज्योतिषाने सांगितलं.
केवळ पाठवणीची वेळ नाही तर इतरही काही भाकितं ज्योतिषी एन. के. पांडे यांनी केली होती. ही भाकितं खरी ठरली आहेत. राजा आणि सोनमने 5 जूनपर्यंत कुठेही फिरण्यासाठी जाऊ नये असं ज्योतिषी एन. के. पांडे म्हणाले होते. मात्र याकडेही सोनम आणि राजाने दुर्लक्ष केलं. यासंदर्भात सोनमच्या वडिलांनी दोघेही एवढ्या लवकर कुठे प्रवासासाठी जात असल्याची कल्पना घरच्यांना नव्हती असं ज्योतिषाला सांगितलं. सोनमच्या वडिलांनी यासंदर्भात बोलताना, लग्नानंतर जावयाने दीड महिना घराबाहेर पडू नये अशी मान्यता आहे. त्यामुळेच सोनमला निरोप देण्यासाठी 5 जूनचा मुहूर्त आम्ही निश्चित केलेला. मात्र 21 मे रोजी सोनम आणि राजा कामाख्या देवीला रवाना झाले, असं सोनमचे वडील देवीसिंह रघुवंशी म्हणाले.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' ज्योतिष विद्येसंदर्भातील दाव्यांसंदर्भातील माहितीची खातरजमा करत नाही.)