Sonam Raghuwanshi Plan B To Kill Husband: देशाला हादरवून टाकणाऱ्या राजा रघुवंशी हत्या प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे समोर येत आहे. राजाच्या हत्येचा कट रचणारी त्याची पत्नी सोनम सध्या शिलाँग पोलिसांच्या ताब्यात असून मागील दोन दिवसांपासून पोलीस तिची चौकशी आहे. या चौकशीदरम्यान सोनम वेगवेगळे दावे करत असतानाच तिने केलेले काही खुलासे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. अशाच एका खुलाश्यामध्ये तिने पतीला संपवण्याचा नियोजित कट फसला असता तर आपण प्लॅन बी तयार ठेवला होता असं सांगितलं आहे.
सोनमने पती राजाच्या हत्येसाठी प्रियकर राज कुशवाहाच्या मदतीने सुपारी दिली होती. इंदोरमध्ये लग्न झाल्यानंतर हत्येसाठी तिने मुद्दामून मेघालयची निवड केली होती. 11 मे रोजी राजा रघुवंशी आणि सोनमचं लग्न झालं त्यानंतर ते 22 मे रोजी हनिमूनसाठी मेघालयला गेले होते. 23 मे रोजी हे दोघेही अचानक बेपत्ता झाले. 2 जून रोजी पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील सोहरा भागात (चेरापुंजी) धबधब्याच्या जवळ एका दरीत रघुवंशीचा मृतदेह आढळला. दुसरीकडे याच दिवशी सोनम रघुवंशी मेघालयातून इंदूरला निघाली, जिथे तिची भेट कथित प्रियकर आणि हत्येचा सह-सूत्रधार राज कुशवाहा याच्याशी झाली, अशी माहिती सूत्रांची माहिती आहे.
सोनमने 23 मे रोजी शिलाँगमध्ये राजाला मारण्याचा प्लॅन केला. मुद्दाम सोनमने फोन करुन सासूशी गप्पा मारल्या. सासूशी बोलत असताना ती नवऱ्यापासून काही अंतरावर चालत पायऱ्या चढत होती. त्यासोबत तीन मारेकरीही पायऱ्या चढत होते. पायऱ्या चढताना मारेकरी थकल्याने त्यांनी हत्या करण्यास नकार दिला. त्यानंतर तिन्ही मारेकरी राजा रघुवंशीसोबत चालायला लागले. थकल्याचे नाटक करून सोनम त्यांच्या मागे चालत राहिली. मारेकरी हल्ला करण्यास उशीर करत असल्याने सोनम मागूनच त्याला मारुन टाका असं ओरडू लागली. सोनम अधिक संतापली तिने मारेकऱ्यांना 14 लाखांऐवजी 20 लाख देते असं सांगून मारेकऱ्यांना हल्ला करण्यासा सांगितलं. अखेर मारेकऱ्यांनी राजाच्या डोक्यावर वार केला. सोनमने स्वत: राजाचा मृतदेह दरीत फेकल्याचंही हल्लेखोरांनी पोलिसांसमोर मान्य केलं आहे.
सोनमने हत्येसंदर्भात धक्कादायक खुलासे केले आहेत. हल्लेखोरांनी ऐनवेळी हल्ला करण्यास नकार दिल्यास काय करावं याचं नियोजन सोनमने केलं होतं. सोनमने हत्येचा प्लॅन बी तयार ठेवला होता. आरोपींनी ऐन वेळी पळ काढला असता तर सोनम सेल्फी काढण्याच्या बहाण्याने राजाला दरीच्या कठड्यावर घेऊन जाणार होती आणि तिथून खाली धक्का देणार होती. हा अपघाती मृत्यू आहे असं दाखवण्याचा तिचा इरादा होता.
पतीची हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच सोनम इंदूरला गेली. तिथे ती एक दिवस इंदूरमध्ये भाड्याच्या खोलीत राहिली आणि नंतर एका ड्रायव्हरने तिला उत्तर प्रदेशला सोडले. पुढील सहा दिवस अशीच लपून छपून राहिल्यानंतर 9 जूनच्या पहाटे सोनम रघुवंशीने उत्तर प्रदेशातील गाजीपूर नंदगंज पोलिस ठाण्यासमोर आत्मसमर्पण केले. सोनमला पोलिसांनी अटक केल्याची असं मेघालय पोलिसांनी सांगितलं.