Marathi News> भारत
Advertisement

Sonia Gandhi रुग्णालयात दाखल! रात्री उशीरा दिल्लीतील रुग्णालयात केलं भरती

Sonia Gandhi Admitted To Hospital: सोनिया गांधी या 78 वर्षांच्या असून अचानक रात्री दहाच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Sonia Gandhi रुग्णालयात दाखल! रात्री उशीरा दिल्लीतील रुग्णालयात केलं भरती

Sonia Gandhi Admitted To Hospital: काँग्रेसच्या संसदीय दलाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी रात्री दिल्लीमधील सर गंगाराम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधींना पोटासंदर्भातील समस्या आहेत. रुग्णालयातील गॅस्ट्रॉलॉजी विभागातील तज्ज्ञ त्यांच्या तब्बेतीवर लक्ष ठेऊ आहेत.

पक्षाकडून कोणतीही अधिकृत माहिती नाही

सोनिया गांधींच्या प्रकृतीसंदर्भात काँग्रेस पक्षाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेले नाही. पक्षाकडून यासंदर्भात कोणीही काहीही पत्रक अथवा विधान केलेलं नाही. सोनिया गांधी मागील काही वर्षांपासून प्रकृतीसंदर्भातील समस्यांना तोंड देत आहेत. आरोग्यासंदर्भातील वेगवेगळ्या समस्यांच्या चाचणीसाठी आणि त्यावरील उपचारांसाठी त्यांना अनेकदा रुग्णालयात भरतीही व्हावं लागलं आहे.

याआधीही रुग्णालयात करण्यात आलेलं दाखल

78 वर्षीय सोनिया गांधींना यापूर्वी 7 जून रोजी शिमल्यातील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय म्हणजेच आयजीएमसीमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आरोग्यासंदर्भातील काही समस्या असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगितलं गेलं होतं. तेथील डॉक्टरांनी सोनिया गांधींच्या प्रकृतीची नियमित तपासणी करतात तशा सर्वसाधारण तपासणीच्या चाचण्या केल्या. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेल्या. मागील काही वर्षांपासून सातत्याने सोनिया गांधींना प्रकृतीसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे.

करोनामुळेही रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं

सन 2022 मध्येही सोनिया गांधींना सर गंगाराम रुग्णालयामध्ये दोन वेळा दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळेस त्यांना श्वास घेण्यात अडचण येत असल्याची समस्या होती. तसेच त्यांना व्हायरल फिव्हर झालेल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. मध्यंतरी करोनाचा संसर्ग झाल्यानेही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. 

Read More